Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / करंजी रोड महामार्गावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

करंजी रोड महामार्गावर ट्रक ने दुचाकीस चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

करंजी रोड महामार्गावर ट्रक ने दुचाकीस चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

करंजी रोड : नागपूर पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर आज दुपारी दीडच्या दरम्यान करंजी रोड महामार्गावर ट्रकने दुचाकीस चिरडले यात दुचाकी वरील एक जण जागीच ठार तर एकजण दवाखान्यात नेत असतांना मृत पावला.

       सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असलेल्या करंजी रोड येथे आज दुपारी दीडच्या दरम्यान दुचाकी क्रमांक MH_34 B X_ 6739 हे पांढरकवडाच्या दिशेने जात असताना मागाहून येत असलेला कानपूर वरून हैदराबादच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक UP_92 T_3569 याने दुचाकीस जोरदार धडक देत चिरडले. यात दुचाकी  वरील गोकुलदास शामराव लांडगे वय 55 वर्ष आणि त्यांची पत्नी सौ. सुनीता गोकुलदास लांडगे वय 45 वर्ष दोघेही राहणार वैशाली नगर गडचांदूर जिल्हा चंद्रपूर गोकुलदास हे जागेवरच ठार झाले तर सोबत असलेली मृतक महिला हिचा दवाखान्यात नेत असताना मृत पावली. घटनास्थळावरून मिळालेल्या आधार कार्ड ,पॅन कार्ड व दुचाकी लायसन्स च्या प्रतीवरून मृतकाची ओळख पटली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच करंजी रोड महामार्ग मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वसुकार , हेड कॉन्स्टेबल शेख साजिद, व अनिल जिरकर यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमी महिलेला पांढरकवडा येथे उपचारार्थ नेले. मात्र तिने  वाटेतच जीव सोडला. घटना घडताच करंजी महामार्गावर बघण्यासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी जमली घटनास्थळावर मृतककाचा मृतदेह पडून होता, तर मृतकास ट्रकने चिरडल्यामुळे जागोजागी रक्ताचा व मासाचा सडा पडून होता.  घटनेनंतर ट्रकच्या मध्ये दुचाकी अडकल्याने आरोपी ट्रक ड्रायव्हर हा ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला. परिणामी ट्रकला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर महामार्ग मदतकेंद्र करंजी तसेच पांढरकवडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल होत त्यांनी घटनेच्या पंचनामा केला. त्यानंतर लोकांच्या मदतीने मृतकास उचलून उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे पाठवण्यात आले असून अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...