Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / नेताजी सुभाषचंद्र बोस...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारत भूमीचा तळपता सूर्य होता** मा. गंगाधर बनबरे

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारत भूमीचा तळपता सूर्य होता**    मा. गंगाधर बनबरे

भारतीय वार्ता प्रतिनिधी( गजेंद्र काकडे )

 

चंद्रपूर- भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता. त्यांचे वकृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की आपसूकच त्यांच्याशी आणि पुढे स्वातंत्र्यलढ्याशी जोडला जाई, नेताजींनी केललं कार्य आजही प्रत्येक तरूणाला प्रेरणा देणार, अन्यायाविरूद्ध हातात शस्त्र उठवायला लावणार अस आहे. म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती असे मत मा. गंगाधर बनबरे, प्रसिद्ध व्याख्याते, पुणे हे शिवमहोत्सव समिती चंद्रपूर द्वारा आयोजित व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसी १२ नोव्हेंबरला "नेताजी सुभाषचंद्र बोस विचार आणि कार्य"  या विषयावर स्थानिक इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे ते बोलत होते.

 

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अशोक मातकर, मुख्य वित्त व लेखाधिकारी, जि. प. चंद्रपूर, प्रमुख व्याख्याते मा. गंगाधर बनबरे, प्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत, पुणे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजयराव बदखल, संचालक इन्स्पायर इन्स्टिटुट, चंद्रपूर, मा. एड. अब्दुल हुसेन, प्रसिद्ध विधी तज्ञ, चंद्रपूर, मा. कांचन जगताप, तहसिलदार, बल्लारपूर, मा. इंजि अक्षय ठाकरे, युवा ऑर्किटेक्ट, चंद्रपूर, मा. पुंडलिकराव उलमाले, कोरपना, मा. अनुद अडकिने, युवा व्यावसायिक, चंद्रपूर, मा. सौरभ भोयर, संचालक, त्रिमूर्ती कॅटरिंग व मॅनेजमेंट, चंद्रपूर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे मा. गंगाधर बनबरे सर म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८८७ रोजी कटक मध्ये झाला. लहानपणापासूनचं ते बंडखोर वृत्तीचे होते. नेताजींना ८ भावडे होती. त्यांचा क्रमांक ९ वा होता. त्यांना शालेय जीवनातच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी, नेताजींनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. पण त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही. म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदाचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरू मानले. आणि तेव्हापासून स्वामी विवेकानंद हेच त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरले. पुढे त्यांची भेट हिटलर सोबत होणार होती. त्यावेळी नेताजींनी हिटलरला पहिल्या भेटीत काय द्यायचे यावर विचार केले आणि त्यांना गौतम बुद्धाची मुर्ती दिली. तेव्हा हिटलरला, गौतम बुद्धाबाबत सांगितले की ही मुर्ती बौद्ध धर्माचे संस्थापक, भगवान बुद्ध यांची असून त्यांनी जगाला अहिंसा आणि करुणा शिकवली होती, असे भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे आपले नेताजी हे थेट हिटलरला जाऊन भेटले. आणि तिथही त्यांनी हिटलर सारख्या माणसाला शांती आणि अहिंसेचे प्रतिक गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन भारत आणि भारतीय हे सदैव सगळयांच्यापुढे का आहेत, याच स्पष्टीकरण दिलं असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

आजचे स्मृतिपुष्प स्मृतिशेष विठाबाई देवरावजी गोखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रशांत गोखरे यांचेकडून देण्यात आलेले होते. यावेळी प्रशांत गोखरे यांनी आपल्या आईबद्दल बोलतांना म्हटले. की, आईने संपूर्ण कुटुंबाला कसे वाढविले कसे संस्कार दिले, आणि वडिलांच्या निधनानंतर स्वतःला व कुटुंबाला कसे सांभाळून घेतले याबाबत सविस्तर सांगितले. पुढे अध्यक्षीय भाषण मा. अशोकराव मातकर यांनी करताना म्हटले की, महापुरूषांनी जे जे कार्य केले ते ते कार्य लॊकांपर्यंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून पोहचविण्याचे कार्य शिवमहोत्सव समिती चंद्रपूर द्वारा करण्यात येत आहे हे फारच मौल्यवान कार्य सुरू आहे. त्यांना आमचे नेहमीच सहकार्य राहील असे ते म्हणाले.

 

कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करतांना स्मृतिशेष दादाजी पाटील गणपतराव आसुटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मा रविभाऊ आसुटकर यांच्याकडून सन्माचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. एड. गजानन नागपूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. एड. शाकीर मलक यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर तसेच परिसरातील हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शिवमहोत्सव समितीच्या सदस्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...