खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
* भारतीय वार्ता ( प्रतिनिधी): गजेंद्र काकडे
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण समृद्ध करण्याकरिता व सांस्कृतिकरणाची प्रक्रिया अधिक जोमाने वाढविण्याकरिता शिवमहोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे मागील 6 वर्षापासून बहुजन महापुरुषांच्या अष्ठपैलू कार्यकर्तृत्वाची माहिती जनमाणसापर्यंत पोहचावी म्हणून दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांचा संदर्भ समजून घेत भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात अपेक्षित बदल व त्यातील तरुणाईची भूमिका समजून घेण्यासाठी पत्रिकेत नमूद विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 11, 12 व 13 नोव्हेंबर ला स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे दररोज सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत करण्यात आलेले असून या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते हे गेले 31 वर्ष मराठा सेवा संघाच्या माध्यमातून भारतीय समाजासमोरील जागतिकीकरणोत्तर कालखंडात निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे मा. गंगाधर बनबरे सर, पुणे यांची उपस्थित राहणार आहे. बनबरे सर तीन दिवस तीन विषयावर मार्गदर्शन करणार असून पहिल्या दिवसी "जननायक बिरसा मुंडा आणि आदिवासी अस्मिता" दुसऱ्या दिवसी "नेताजी सुभाषचंद्र बोस : विचार आणि कार्य" तर तिसऱ्या दिवसी "प्रबोधनाचा ज्वालामुखी - प्रबोधनकार ठाकरे" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे.
पहिल्या दिवसी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संतोष कुचनकर, जिल्हाध्यक्ष, मराठा उद्योजक कक्ष, चंद्रपूर, दुसऱ्या दिवसी मा. अशोक मातकर, मुख्य वित्त व लेखाधिकारी, जि. प. चंद्रपूर तर तिसऱ्या दिवसी मा. इंजि. चंद्रकांत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, चंद्रपूर यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक मा. प्रकाश जाधव, माजी खासदार, रामटेक यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला आपण सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे, निमंत्रक विनोद थेरे, सदस्य प्राचार्य सूर्यकांत खनके, डॉ. सचिन भेदे, इंजि. दिपक खामनकर, आशाताई ठाकरे, प्रा. डॉ. योगेश्वर दूधपचारे, दिपक जेऊरकर, डॉ. विनोद माहूरकर, अरुण धानोरकर, प्रा. डॉ. दिलीप चौधरी, कुसुमताई उदार, ऍड. मलक शाकीर, डॉ. सचिन धगडी, प्रा. किरणकुमार मनुरे, चंद्रकांत वैद्य, प्रा. धिरज शेडमाके, लताताई होरे, डॉ. विवेक बोंबोळे, संजय जुनारे, डॉ. रुपेश ठाकरे, मोरेश्वर चटप, सूर्यभान झाडे आदी मान्यवरांनी केले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...