वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
दिनांक 07 नोव्हेंबर 2022 रोजी 22:30 वा. ते 22:45 वा चे सुमारास पो.स्टे. दुर्गापूर हद्दीत ईमली बार व नायरा पेट्रोलपंप समोर दुर्गापूर रोडवर पूर्व वैमन्यस्यातून 7 ते 8 इसमांनी मृतक नामे महेश मेश्राम रा. दुर्गापूर हा ईमली बार येथे मित्रा सोबत गेला असतांना नमुद आरोपीतांनी त्यांचेवर पाळत ठेवून घेराव घालून धारदार घातक शस्त्रांनी वार करून जिवानीशी ठार केले व त्याचे शिर निर्दयपणे धडावेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळुन गेले. अशा रिपोर्ट दुर्गापूर पोलीस स्टेशनला अप. क. 189/2022 कलम 302, 143, 147, 149, 427 भा.द.वी. सह कलम 4. 25 भारतिय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोउपनि अतुल कावळे यांचेसह अंमलदारांची चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली. सदर पथकांनी अज्ञात आरोपीतांचे नांव व त्यांचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला असता यातील संशयीत आरोपीत इसम हे वर्धा जिल्हयात स्कॉर्पीओ गाडीने पळुन जात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यावरून लागलीच सदर वाहनाचा माग काढून स्थागुशा चे सपोनि कापडे व सपोनि भोयर यांचे पथकानी पाठलाग करून सदर स्कॉर्पीओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले व योग्यती काळजी घेवून शिताफीने वाहनामधील संशयीत नामे 1) अतुल मालाजी अलीवार, वय 22 वर्ष रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, 2) दिपक नरेद्र खोब्रागडे, वय 18 वर्ष रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, 3) सिध्दार्थ आदेश बन्सोड, वय 21 वर्ष रा नेरी दुर्गापुर, 4) संदेश सुरेश चोखान्द्रे, वय 19 वर्ष रा सम्राट अशोक वार्ड क 2 दुर्गापुर चंद्रपुर, 5) सुरज दिलीप शहारे वय 19 वर्ष रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, 6) साहेबराव उत्तम मलिये वय 45 वर्ष रा नेरी समतानगर वार्ड क 6 दुर्गापुर, 7) अजय नानाजी दुपारे वय 24 वर्ष रा उर्जानगर कोडी दूर्गापुर व 8) प्रमोद रामलाल सूर्यवंशी, वय 42 वर्ष, राउजीनगर दुर्गापुर अशा एकूण 8 संशयीत आरोपीत इसमाना स्कॉर्पीओ वाहनासह गुन्हा घडल्यापासुन अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.
सदर संशयीत आरोपीताना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन त्यांचेकडे गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता यातील संशईत आरोपी क्र. 1 ते 6 यांचा सदर गुन्हयात प्रत्यक्ष सहभागी असून यातील आरोपी क्र. 7 व 8 यांनी आपले ताब्यातील चारचाकी स्कॉर्पीओ वाहन क्र. एम.एच. 04 जिझेड 9091 नी वरिल नमुद अरोपीतास पळून जाण्यास मदत केली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असल्याने नमुद आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन दुर्गापूर यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे स.पो.नि. जितेंद्र बोबडे, स.पो.नि. संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, पो.उपनि, कावळे, पो. हवा. संजय आतकुलवार, धनराज करकाडे, सुरेद्र महतो, नितीन साळवे, ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, जमीर पठाण, मलिंद चव्हाण, गजानन नागरे, अजय बागेसर पो.कॉ. गोपाल आतकूलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, मिलींद जांमुळे, प्रशांत नागोसे, गोपीनाथ नरोटे, महीला अंमलदार अपन मानकर तसेच सायबर पोस्टे येथील पोहवा मुजावर अली यांनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...