वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (घुग्घुस विशेष प्रतिनिधि): चंद्रपूर : धारिवाल कंपनी मध्ये रोजगार, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जलप्रदूषण, वाहतुकीचे अडथळे याबाबत सात दिवसाच्या आत सुधारणा व अमलबजावणी करण्याचा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी धारिवाल व्यवस्थापनाला दिला. आज खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आयोजित बैठकीत विविध समस्यांवर चर्चा केली.
धारिवाल इन्फास्ट्रक्चर लिमी, ताडाली, ता. जि चंद्रपूर च्या परिसरातील नाल्यामधून प्रदूषित पाण्याने जनावरांवर गंभीर परिणाम होत असून, शेतकऱ्यांच्या शेतात दूषित पाणी, गेल्याने सन २०१६ पासून तर आजवर पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत नुकसानभरपाई देण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.
यावेळी जिलाधिकारी विनय गौंडा, आमदार प्रतिभाताई धानोरकर, तहसीलदार चंद्रपूर, तहसीलदार कोरपना, तालुका अध्यक्ष श्याम थेरे, नंदू धानोरकर, रोशन रामटेके, आशिष देरकर, विजय बल्की यांची उपस्थिती होती.
यासोबतच खुटाळा ता. जि चंद्रपूर येथील निवासी अतिक्रमितांना हटविण्याचे नोटीस बाबत पुनर्विचार करून तोडगा काढण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या. तसेच कोरपना तालुक्यातील विशेषतः पिपळगाव, नांदा, बीबी, बाखर्डी, लखमापूर, कवठाळा येथील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे अत्यल्प नुकसानभरपाई मिळाली. याबाबत पुन्हा सर्वेक्षण करून न्याय देण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर व जिल्ह्याधिकारी विनय गौंड यांनी तहसीलदार कोरपना यांना दिल्या.
कोरपना तालुक्यात ८ हजार ६६५ बाधित क्षेत्रात १३ हजार २२४ शेतकऱ्यांना १३ कोटींचा निधी नुकसान भरपाई साठी शासनाकडून प्राप्त झाल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. मात्र चुकीच्या सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्याने या ठिकाणी पुनःसर्वेक्षनाचे आदेश देण्यात आले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...