Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना कृषी उत्पन्न...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आशीर्वादाने जिनिंग मध्ये मालाची खरेदी शेतकऱ्याची सर्रास लुट...

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आशीर्वादाने जिनिंग मध्ये मालाची खरेदी  शेतकऱ्याची सर्रास लुट...

मंगेश तिखट( चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): कोरपनाकृषी उत्पन्न बाजार समिती नियम धारेवर ठेऊन प्रशासक व सचिवाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्याची सर्रास लुट होत असताना कोरपना बाजार समिती क्षेत्रात अनेक जिनिंग धारकांनी सोयाबीन खरेदी केल्या बाजार समितीचे शेअर्स बुडवले जात असताना तसेच मोजमाप काटा पासिंग झालेले नाही तसेच राज्यभर दलाली बंद असताना सर्रास दलाली व नेट कॅश च्या नावावर २ % लुट होत आहे. कोरपना येथे लिलावाचे वेळापत्रक नाही. गडचांदूर कोरपना यार्ड येथे  त्यामुळे कोरपना येथे व्यापाऱ्याचा दारात धान्य विक्री होत असताना बघ्याची भूमिका कर्मचारी व सचिव हे पदाधिकारी घेत असून बाजार समितीच्या उत्पन्नाला चुना लावीत आहेत. बाजार समितीने तत्काळ भुई काट्याची व्यवस्था यार्ड वर करावी बाजार समितीचे तत्कालीन  सभापती गोडे यांना केली होती.

तरी याच्यावर कार्यवाही झालेली नव्हती गतवर्षी व्यापारी काटयात रिमोड चा  गैरव्यवहार उघड पडले होते या चालु हंगामात हजारो क्विटल सोयाबिज खरेदी करून जीनिग धारकांनी व व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे शेअर्स बुडवले आहे. व हजारो क्विटल सोयाबीन खरेदी विक्री व्यवहार जिनिंग धारकांनी केले असताना बाजार समिती कडे कोणतेही नोंदणी  नाही. सदर कोरपना तालुक्यातील कापूस खरेदिचा परवाना आहे परंतु त्यांना तेलबिया व कडधान्याचा परवाना नसून शेतकऱ्याचे  थेट सोयाबीन सर्रास जिनिंग वाले खरेदी करत आहे. राज्यात कसल्याही  प्रकारची दलाली नसताना व्यापारीच दलाल बनून शेतकऱ्याची लुट करत आहे.

 सौदा पट्टी न फाडता व्यवहार सुरू आहे हि मोठी गंभीर बाब असून शेतकरी हतबल व अतिवृष्टी पावसाने संकटात असताना शेतकऱ्याची लुट करून जखमेवर मीठ चोळत आहे.यामध्ये बाजार समितीचे साटे लोटे असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक लुट होत आहे.यामध्ये बाजार समितीच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. माजी बाजार समितीमध्ये स्वतंत्र काटा लावून शेतकऱ्याची तत्काळ लुट थांबवावी  अन्यथा शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आमच्या प्रतिनिधीने प्रशासक व सचिवाशी संपर्क केले असता

प्रशासकांनी मी गर्दी मध्ये असल्याने मी या विषयावर बोलू शकत नाही असे उत्तर दिले. तसेच कवडू देरकर यांनी आम्ही शेतकर्यांना प्रशिद्दी पत्रकाद्वारे शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट यार्ड मध्ये लीलावा मध्ये विक्रीस आणावा असे आव्हान केले आहे तसेच जीनिग मध्ये थेट खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे शेतकर्याची तक्रार प्राप्त झाल्यास वजन व दलाली सबंधात तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाही करू असे सांगितले.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...