वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस-प्रतिनिधी): कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रपुरातील श्री क्षेत्र वढा येथे शुक्रवारी दिंडी काढण्यात आली आहे.या दिंडीत अनेक भाविकांनी सहभाग घेतला.येत्या 8 नोव्हेंबर पासून यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती श्री स्वामी चैतन्य महाराज यांनी दिली आहे.
वढा हे तीर्थक्षेत्र विठ्ठल-रुख्माई मंदिर आणि या वार्षिक यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. हे स्थळ चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हजारो भाविक यात्रेसाठी वढा येथे दाखल होतात. देवदर्शन आणि वार्षिक खरेदी करून भाविक वढा येथून रवाना होतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे घुग्गूस हे औद्योगिक क्षेत्र. या परिसरात त्रिवेणी संगमावर आहे 'वढा'. कार्तिक पौर्णिमेनिमित्त वढा येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराची वार्षिक यात्रेला प्रारंभ झाला आहे. गेली शेकडो वर्षे या संगमस्थळी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी वढा येथे दाखल होतात.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी या शहरातून वाहणारी निर्गुडा नदी, रुख्मिणी मातेचे माहेर असलेल्या कौंडिण्यपूर येथे उगम पावणारी पैनगंगा नदी आणि विदर्भाची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा अनोखा संगम वढा परिसरात होतो. या त्रिवेणी संगमावर स्नान करून उंच बांधलेल्या विठू-रुख्माई मंदिरात दर्शन घेत संगमस्थळी पूजा करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. दरम्यान घुग्गुस पोलिसांचे पथक देखील तैनात करण्यात आले आहे.
वढा यात्रा चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांसाठी विशेष महत्वाची आहे. संगमाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेवर विठू-रुख्माईचे आणि बालाजीचे मंदिर, यवतमाळ जिल्ह्यात किनाऱ्यावर 'जुगाद' हे प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आणि कोरपना तालुक्यातील 'हनुमानाचे' मंदिर यामुळे इथले धार्मिक पर्यटन वर्षभर भक्तांना खुणावत असते. लाखो भाविक दरववर्षी न चुकता वढा तीर्थक्षेत्री दाखल होत आपली श्रद्धा जपतात.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...