भारतीय वार्ता :जिवती प्रतिनिधी( अनिल जगन्नाथ शिंदे कनिष्ठ अभियंता वर्ग 2 ता . जिवती , जि . चंद्रपूर यांना लाचेच्या सापळा प्रकरणात रंगेहाथ अटक तक्रारदारह्याच्या तक्रारीवरून अविनाश भामरे पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्या टिमने ही कार्यवाही करून आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. या विषय सविस्तर वृत असे की,तक्रार कर्ते हे ठेकेदारी व्यवसाय करणारे असून . तक्रारदार यांनी मागील वर्षी सप्टेंबर / आक्टोबर महिण्यामध्ये आर.सि.एल. डब्ल्यु.ई . या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत मुंगसाजी कॅन्स्ट्रक्शन कंपणी , यवतमाळ तर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका येथील पुल बांधणीचे कामे घेतलेली होती . सदर पुल बांधणीचे कामे तक्रारदार यांनी पुर्ण केलेले असुन केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण गै.अ. शिंदे यांचेकडून करण्यात आलेले होते . तक्रारदार यांनी केलेल्या संपुर्ण कामाचे अंदाजे १ कोटी रूपयाचे एकुण ४ बिले असुन सदर ४ बिलांपैकी २ बिलं तयार करून मंजूर करणेकामी सार्वजनीक बांधकाम विभाग , चंद्रपूर येथे पाठविणेकरीता तसेच बिलं मंजूर झाल्यानंतर उर्वरित २ बिलं तयार करून मंजूरीकरीता पाठविण्याच्या कामाकरीता गै.अ. शिंदे यांनी २ लाख रूपये लाच रक्कमेची मागणी केली . परंतु तक्रारदार यांची अनिल जगन्नाथ शिंदे , कनिष्ठ अभियंता ( वर्ग २ ) सार्वजनीक बांधकाम उपविभाग , जिवनी , ना . जिवती , जि . चंद्रपूर यांना २ लाख रूपये लाच रक्कम देण्याची मागणी केली असता, फिर्यादी मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द लाप्रवि . कार्यालय चंद्रपूर येथे दि . ०७/०६/२०२२ रोजी तक्रार दिली होती . प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०८/०६/२०२२ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांचेकडे २ लाख रू . ची मागणी करून तक्रारदार यांचे बिलं मंजूर झाल्यानंतर स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले होते . त्यावरून दि . ०१/११/२०२२ रोजी सापळा रचून ही कार्यवाही करून घेतली त्यावेळी कार्यवाहीदरम्यान गै.अ. अनिल जगन्नाथ शिंदे , कनिष्ठ अभियंता ( वर्ग २ ) यांनी पंचासमक्ष लाचरक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले . सदरची कार्यवाही ही मा . विशाल गायकवाड , पोलीस अधीक्षक , ला.प्र . वि . नागपुर मधुकर गिते , अपर पोलीस अधिक्षक , ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे , ला.प्र.वि. चंद्रपूर , पो.नि. शिल्पा भरडे तसेच कार्यालयीन स्टॉफ सफौ . रमेश दुपारे , नापोकॉ . रोशन चांदेकर , नरेशकुमार नन्नावरे , पोकॉ . रविकुमार ढेंगळे , वैभव गाडगे , अमोल सिडाम , राकेश जांभुळकर , मपोकॉ , मेघा मोहुर्ले , पुष्पा काचोळे व चापोकों हाके यांनी यशस्वी पार पाडली आहे . अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे .त्या साठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूर फोन क्र . ०७१७२-२५०२५१ टोल फ्री नंबर- १०६४ श्री . अविनाश भामरे , पोलीस उप अधीक्षक Website www.acbmaharashtra gov in ८८८८८२४५ ९९ aus L अविनाश वा पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग , चंद्रपूर यांनी आव्हान केले असून जनता जागृत झाली तर भ्रष्टाचाराला आळा घातल्या जाऊ शेकतो, शोषण करणाऱ्या व्यवस्थेला गाळण्या साठी समोर आले तरच रोख देऊ शेकतो, जागृत होवा समोर या असे आव्हान केले गेले आहे.