Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / शेतकरी अनुदानापासून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

शेतकरी अनुदानापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना दिवाळी किट मिळालेच नाही दिवाळी अंधारात

शेतकरी अनुदानापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना दिवाळी किट मिळालेच नाही दिवाळी अंधारात

राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुहेल अली यांचा आरोप

तालुका प्रतिनिधी:  शासनाने जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसानीचे पंचनामे करून दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा सहा हजार आठशे ऐवजी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्याची गोड घोषणा केली मात्र दिवाळी साजरी होईल हतबल झालेला शेतकरी मोठ्या आशेने दिवाळी साजरी करण्याचा बेत आखला प्रशासनाकडून गावनिहाय याद्या तयार करून प्रसिद्धी देण्यात आली मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रकमात जमा झाली नसल्याने पावसाने पिकावर पाणी फिरवले तर शासनाने घोषणा करून दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरवल्याचे चित्र या भागात असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीच्या दिव्या ऐवजी अंधार दिसून आला.

 महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतोदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना आनंदा दिवाळी किट देण्याची घोषणा केली व 100 रुपयांमध्ये दिवाळीचा आनंद साजरा होईल अशी आशा शिधापत्रिका धारकांना होती मात्र कोरपणा तहसीलचे मुख्यालय असलेल्या शहरांमध्ये अंतोदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना शंभर रुपयाचे किट उपलब्ध झाले नसल्याने दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे यामुळे शासनाची घोषणा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे व प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात धान्य किट वाटप करण्याची घोषणा करण्यात आली होती दिवाळीचा तिसरा दिवस साजरा होत असताना मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान व अंतोदय लाभार्थ्यांच्या आनंद धान्य साखर तेल रवा किट उपलब्ध झाले नसल्याचे अनेकांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे कोरपणा या शहरांमध्ये अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने कोरपणा व उर्वरित गावामध्ये धान्य किट पोहोचून सुद्धा वाटप का करण्यात आले नाही शासनाने पास मशीन ऐवजी ऑफलाइन वितरण करण्याचे सुद्धा निर्देश दिले असताना दिवाळी सारख्या सणासाठी शासनाच्या लाभापासून शेतकरी व अंतोदय लाभार्थी वंचित असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान व अंतोदय प्राधान्य कुटुंबांना धान्य वितरण करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...