वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : बँकेत मुदत ठेव केल्यास जास्त व्याज मिळणार या आमिषाला बळी पडत साखरी येथील काही नागरिकांनी गावातीलच नितेश नामक युवकावर विश्वास ठेवत त्यांच्या सांगण्याप्रमाणे बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी येथिल बँकेत नविन योजना आली असून यात मुदत ठेव केल्यास जास्त प्रमाणात मासिक व्याज मिळणार असल्याचे सांगून दहा ते बारा नागरिकांना करोडो रुपयात फसविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून त्या विरोधात काही नागरिकांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तर काही नागरिक परत पैसे देणार या भरोशावर अजूनही वाट पाहत आहे.
राजुरा तालुक्यात साखरी येथे वेकोलीचा पोवानी-२ व पोवनी-३ प्रकल्प आला आणि पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला जास्त प्रमाणात दिला यामुळे साखरी गाव हे जिल्ह्यात करोडपती गाव म्हणून प्रसिद्ध झाले होते. या प्रकल्पात अनेकांच्या जमिनी वेकोलीने अधिग्रहित केल्या असून त्याच्या मोबदल्यात काहींना करोडो रुपये मिळाले आहे. काहींनी मिळालेल्या राशीची योग्य गुंतवणूक केली तर बहुतांश नागरिकांनी मिळालेली रक्कम वेगवेगळ्या बँकेत ठेवलेली आहे. अशातच साखरी येथील नीतेश हा युवक बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी येथे स्टार युनिअन डायल ईची कंपनीचा विमा काढण्याचे काम करीत होता. या युवकांनी गावातील काही नागरिकांना गळाशी धरून बँक ऑफ इंडियाने नवीन योजना आणली असून या योजनेत मुदत ठेव केल्यास जास्त प्रमाणात महिन्याला नगद स्वरूपात व्याज मिळणार व केव्हाही रक्कम उचल करता येणार असे सांगून काहींची खात्री बसविण्यासाठी त्यांना दोन तीन महिने दर महिन्याला वाढीव व्याजाची रक्कम नगदी दिली. महिन्याला जास्त व्याज मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत इतर नागरिकांनी दुसऱ्या बँकेत असलेल्या रक्कमा उचल करून काहींनी स्वतःच्या नावे तर काहींनी पत्नीच्या, आपल्या परिवारातील सदस्यांच्या नावाने मुदत ठेव करण्यासाठी रक्कम उगले या युवकाकडे दिल्या. त्याने मुदत ठेव करणाऱ्याच्या नावाने नविन खाते काढून त्या खात्यावर मुदत ठेव केल्याच्या बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी या बँकेचा शिक्का मारलेल्या पावत्या आणून नागरिकांना दिल्या. सांगितल्याप्रमाणे नागरिकांना दोन तीन महिने व्याज स्वतः आणून देत होता. त्यानंतर उगले आपल्या भावासोबत दारू पिऊ लागला, एक दिवस आत्महत्या करतो म्हणून घर सोडून निघून गेला तेव्हा काही नागरिकांना संशय आल्याने बँकेत चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या पावत्या खोट्या असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नागरिकांनी नितेश यांना रक्कम परत मागितली असता माझ्याकडे पैसे नाही आहे, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशाप्रकारचे उत्तर देत असल्याने. पोटची भाकर समजल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात मिळालेली रक्कम बँकेत ठेवीच्या नावावर गावातील युवकाने फसविल्याचे माहीत होताच अनेकांना जोरदार धक्का बसला आहे.
या प्रकरणात साखरी या गावातील जवळपास दहा ते बारा नागरिकांची फसवणूक झाली असून काही बाहेरचे नागरिक सुद्धा या आमिषाला बळी पडल्याचे सांगण्यात येत आहे. जास्त प्रमाणात व्याज मिळणार म्हणून काहींनी पाच लाख, दहा लाख तर काहींना वीस लखापर्यंतची रक्कम मुदत ठेव म्हणून जमा केली मात्र या सर्वांना गावातीलच एक युवकाने गंडा घातला आहे. हा आकडा पुन्हा समोर वाढण्याची शक्यता असून नागरिक राजुरा पोलीस ठाण्यात एकामागे एक तक्रारी देत असून आरोपी गावात मोकाट हिंडत आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीला पकडून कडक सजा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
एक दोन नागरिकांच्या तक्रारी आल्या आहे आणखी काही जस्या तक्रारी येईल या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येईल झालेल्या चौकशीचा अहवाल बनवून समोरील कारवाई करिता वरिष्ठांकडे पाठविणार आहे. : संतोष दरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजुरा
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...