वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
घुग्घुस शहरातील आंबेडकर नगर व शिव नगर वसाहतीच्या जवळील झूडपात वाघाने घुमाकूळ घालून दोन वासरांना ठार केले.
बुधवार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास आंबेडकर नगर व शिव नगर वसाहतीच्या जवळील झूडपात एका वाघाने दोन वासरांना ठार केले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अनिल रामाजी काळे (४५) रा. आंबेडकर नगर, घुग्घुस हा आपल्या गाय व बकऱ्या चारण्यासाठी जवळील झूडपात दररोज नेत असतो. बुधवारी रात्री पाऊस आल्याने त्यांच्या गाई घरी परत आल्या नाही. पाऊस आल्याने गाई झुडुपात थांबल्या होत्या.
रात्री १० वाजताच्या सुमारास वाघाने दोन गाईच्या वासरांवर हल्ला केला व ठार केले. एक वासरू मृत अवस्थेत झुडुपात पडून होता तर एका वासरूला फरकटत घेऊन गेल्याने त्याचा पत्ता लागला नाही.
आवाज ऐकू आल्याने नागरिकांनी झुडुपा कडे बघितले असता वाघाचे डोळे दिसले.
सकाळी अनिल काळे व नागरिकांनी झुडुपात जाऊन बघितले असता जमिनीवर वाघाच्या पंजाचे चिन्ह दिसून आले तसेच एक वासरू मृत अवस्थेत झुडुपात पडून होते तर एका वासराला फरकटत नेल्याने त्याचा थांग पत्ता लागला नाही.
याबाबत कळताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, सिनू इसारप, काँग्रेसचे शेखर तंगलपेल्ली, भाजपाचे गुरूदास तग्रपवार, विशाल दामेर,असगर खान, श्रीनिवास येरला यांनी घटनास्थळी घाव घेतली.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी लगेच याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना कळविले त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याठिकाणी जाऊन पाहाणी करण्यास सांगितले.
वन रक्षक भूषण गोधने, सुनील कुमरे, प्रकाश आत्राम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केले व त्याठिकाणी सीसीटीवी कॅमेरा लावण्यात येणार आहे.
याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी परिसरात वाघाचा वावर होत असल्याने झुडुपा कडे नागरिकांनी जाऊ नये व सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...