Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / रानडुकराच्या हल्ल्यात...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी शेतकऱ्याला वनमंत्री मुनगंटीवारांच्या हस्ते धनादेश वाटप* *माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रयत्नांना यश; ३० दिवसात मिळाली आर्थिक मदत*

रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी शेतकऱ्याला वनमंत्री मुनगंटीवारांच्या हस्ते धनादेश वाटप*                              *माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रयत्नांना यश; ३० दिवसात मिळाली आर्थिक मदत*

*

 

राजुरा : चुनाळा येथील शेतकरी अजय नथ्थु  कार्लेकर यांच्यावर एक महिन्यांपूर्वी शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केला त्या हल्ल्यात गंभीर जखमी अजयवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात याला. वनविभागाला वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत व जखमींना वेळेत मदत पोहचविण्याचे आदेश केले  होते. त्या आदेशाचे पालन करीत वनविभागाने जखमी अजय कार्लेकर यांना ३० दिवसाच्या आत आर्थिक मदत मंजूर केली आहे. आज (दि. १३) वनअकादमी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते एक लाख पंचेविस हजार रुपयांचा धनादेश जखमीची पत्नी विमल अजय कार्लेकर यांना देण्यात आला. यावेळी राजूऱ्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर, उप वनसंरक्षक स्वेता बोडू, उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, चूनाळा ग्राम पंचायतीचे सरपंच बाळनाथ वडस्कर, भाजप किसान मोर्चा चे प्रदिप बोबडे उपस्थितीत होते.

 

ग्रामीण भागात शेतात मोठ्याप्रमाणात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू आहे. भीतीमय परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतात काम करणे धोक्याचे आहे. अशा  वातावरणात काम करीत असताना चुनाळा येथील अजय नथ्थु कार्लेकर यांच्यावर रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्याचेवर उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे उपचार सुरु असताना. राजुरा गडचांदूर येथील (३ सप्टेंबर) व्यस्त दौऱ्यात सुधिरभाऊ मनगंटीवार यांना माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी ही बाब सांगितली परंतू व्यस्त कार्यक्रमामुळे दिवसा भेट घेता आली नाही, पण या घटनेची आठवण ठेऊन कार्यक्रम आटोपून मध्यरात्री १२ वाजले असतांना सुद्धा दवाखान्यात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याची भेट घेऊन विचारपूस करीत जखमींचे सांत्वन केले यातूनच मुनगंटीवार यांचे उपस्थितांना माणुसकीचे दर्शन दिसून आले. यावेळी रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर कुळमेथे यांना जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. व उपस्थीत असलेले उप विभागीय वन अधिकारी अमोल गर्कल व वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, प्रभारी तहसिलदार गांगुर्डे यांना नियमानुसार वेळेत जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

 

त्यानुसार वनविभागाने ३० दिवसात जखमींना आर्थिक मदत म्हणून एक लाख पंचेविस हजार मंजूर केले. मंजूर धनादेश वितरित केल्याबद्दल कार्लेकर कुटुंबीयांनी  वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व वन विभागाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...