Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा

घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा

ट्रान्सपोर्ट हायवा चालक/मालक युनियनची मागणी

 

 

 

घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ट्रान्सपोर्ट हायवा चालक/मालक युनियन घुग्घुसतर्फे ठाणेदार बबन पुसाटे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

घुग्घुस काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष  राजू रेड्डी व किसन सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पाचारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने ठाणेदार बबन पुसाटे यांना निवेदन देऊन बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकावर कोळसा तस्करीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. यावेळी राजू रेड्डी, रोशन पचारे, सय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार, विशाल मादर, नुरुल सिद्दीकी, दीपक पेंदोर, देव भंडारी, अनुप भंडारी, साहिल सय्यद, सुनील पाटील, राकेश डाकूर, आरिफ शेख उपस्थित होते.

गुप्ता कोल वाशरी ते ताडाळी सायडींग पर्यंत कोळसा वाहतुकीचे काम ट्रक चालक/ मालक स्वतःच्या ट्रकने करतात. ट्रक चालक/मालकांचे ट्रक हे बालाजी ट्रान्सपोर्ट व सप्रा ट्रान्सपोर्टमध्ये चालतात सर्व ट्रान्सपोर्टींगचा व्यवसाय ट्रक व चालक यांच्यावर अवलंबून आहे.

२६ सप्टेंबर रोजी ट्रक क्र. एमएच ३४ बीजी ६२२९ या ट्रक चालकाने कोळश्याची अफरातफर केली. याबाबत कळताच ट्रकचे मालक रोहित जयस्वाल यांनी ही माहिती स्वतः पोलीसांना दिली तसेच तक्रार दिली. ट्रक मालक रोहित जयस्वाल यांनी स्वतः चालकास पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. पोलीसांनी तपास करून आरोपींना अटक केली.

परंतु काँग्रेस नेत्यांनी या घटनेला राजकीय रंग दिला. या घटनेशी कोणताही संबंध नसणाऱ्या बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व बदनामी केली. राजकीय द्वेषातुन बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकाची नाहक बदनामी करण्यात येत आहे. हा प्रकार अतिशय नींदनीय असून याचा आम्ही निषेध करतो व अश्या काँग्रेसच्या नेत्यांवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी ट्रान्सपोर्ट हायवा चालक/मालक युनियन घुग्घुसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...