वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: संपूर्ण देश हा ऑगस्ट महिन्यापासून पारंपारिक सण उत्सव साजरा करीत असतो. सण उत्सव आले म्हणजे मिठाई ही शंभर टक्के आलीच, पण येणारी मिठाई ही दुकानातून येते आणि ती आपल्या आरोग्यास कितपत योग्य असेल यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण दुकानात मिठाई विकत घेताना ती कधी तयार केली आहे, ती तयार केल्यापासून किती दिवस खाण्याकरिता योग्य राहील, आपण याची कधी विचारणा दुकानदाराला करत नाही. प्रत्येक वस्तूला एक एक्सपायरी डेट असतेच पण दुकानदार ग्राहकांच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल याकडे त्याचे लक्ष असते. एखादी कालबाह्य झालेली मिठाई किंवा खाद्यपदार्थ तो विकताना नागरिकांच्या आरोग्याचा जराही विचार करत नाही.
दुकानदार म्हणतो की, साहेब आम्ही रोज खाद्यपदार्थ किंवा मिठाई तयार करतो. ती रोजच विक्रीला जाते. मग दुकानदार मिठाई किंवा खाद्यपदार्थावर कालबाह्य तिथी का बरं लिहित नाही? मिठाईचा ट्रेवर मिठाईचे नाव, किंमत ही जशी ठळक अक्षरात लिहितात तसेच मिठाई तयार केल्याची तारीख आणि अंतिम वापराची तारीख का बरं लिहिली जात नाही. काही प्रसिद्ध दुकानात तर मिठाईचे नाव आणि किमतीच्या कार्डवर कालबाह्य तिथी असे लिहिले असते पण तिथे तारीखच लिहिलेली नाही आणि हास्यास्पद म्हणजे ते बनवलेले कार्ड हे लॅमिनेशन करून ठेवलेले दिसतात.
त्यामुळे नागरिकांना-ग्राहकांना आवाहन आहे की, मिठाई किंवा खाद्यपदार्थ विकत घेत असताना कृपया उत्पादनाची तारीख आणि अंतिम वापराची तारीख ज्या दुकानात लिहिलेली असेल त्याच दुकानातून विकत घ्यावी. ग्राहकांनी दुकानदाराला उत्पादनाची तारीख आणि अंतिम वापराची तारीख का लिहिली नाही? यावर प्रश्न विचारावे आणि तरी देखील दुकानदार दोन्ही तारीख लिहिण्यास नकार देत असेल किंवा वारंवार सांगून लिहीत नसेल तर त्याची तक्रार स्थानिक ग्राहक पंचायत किंवा अन्न औषध प्रशासनाकडे करावी.
अन्न व औषध प्रशासनाने अशा दुकानदारावर लगेच कारवाई करावी तसेच सणासुदीच्या दिवसात ज्यावेळी जास्तीत जास्त मिठाई व इतर खाद्यपदार्थ विकल्या जातात अशा दिवसात एक चम्मू तयार करून किंवा स्थानिक ग्राहक पंचायत ला संपर्क करून तेथील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण दुकानात तपासणी मोहीम राबवावी जेणेकरून ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही असी मागणी ग्राहक पंचायत भद्रावती अन्न व औषध प्रशासन विभाग, चंद्रपुर यांना या माध्यमातून करत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...