वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : शहरातील नवीन दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी भर पावसात बुधवारी शिवसेनेच्या वतीनं लोटांगण आंदोलन करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे, शहेशाह शेख, शिवसेना महिला नेता उजवला नलगे यांच्यासह युवा शिवसैनिक व अनेक नागरीकाची उपस्थिती होती.
दारूबंदी उठल्यानंतर नवीन देशीदारू तसेच वाईन शाप,बिअर शाप, दुकानाला घुग्गुस शहरात परवानगी देण्यात आली. वाईन शापला बसवुन दारू पिण्मायाचा परवाणगी नसतानाही राञी उशीरा पर्यत दारूची दुकाने उघडे असतात पुलिस प्रशासनचा या दुकानदारावर कोणतेही कारवाई होत नसल्यामुळे मुजोरीने दुकान सतत सुरू असते 22 जानेवारीला घुग्गुस नगरपरिषद मध्ये शिवसेनेच्या वतीनं नवीन दारू दुकानांना परवानगी देऊ नये असे पत्र देण्यात आले होते.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाने या नवीन दारू दुकानाला परवानगी दिली.
या दारू दुकानजवळ शाळा, महाविद्यालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,बँक,ब्युटी पार्लर आहे.तसेच याच रस्त्यावर दर रविवारीआठवडी बाजार सुद्धा भरत असून नागरिक व महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.इतकेच नव्हे तर या परिसरात संपूर्ण दारू मुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग ,घुग्घुस पोलीस स्टेशन व नगरपरिषदकडे या अवैध दारू दुकानाची परवानगी रद्द करण्याची मागणी घुग्गुस शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली होती.मात्र शिवसेनेच्या निवेदनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.
मात्र घुग्गुस शहरातील दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी भर पावसात बुधवारी शिवसेनेच्या वतीनं लोटांगण आंदोलन करण्यात आले.दारू दुकान तात्काळ हटवा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...