वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : येथून जवळच असलेल्या बेलसनी गावातील जि. प. उच्च प्राथ. शाळेत एक सहाय्यक शिक्षक देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बेलसनी हे जवळपास गाव १,००० हजार लोकवस्तीचे असून येथे पं. स. चंद्रपूर अंतर्गत वर्ग १ ते ७ पर्यंतची जि. प. उच्च प्राथ. शाळा आहे. येथील विद्यार्थ्यांची पट संख्या ७३ असून शिक्षण घेत आहे. सध्या या शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहे.
यापूर्वी या शाळेत चार शिक्षक कार्यरत होते परंतु यातील एक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने एका शिक्षकाची जागा रिक्त आहे.
कोविडच्या काळानंतर प्रथमच शाळा नियमित सुरु झाली आहे. परंतु शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
चालू शैक्षणिक सत्र प्रारंभ झाल्यापासून तीन महिने होत आहे. परंतु आता पर्यंत सहाय्यक शिक्षक शाळेला मिळाला नाही.
त्यामुळे येथील शाळा शिक्षण समितीतर्फे निवेदन देऊन रिक्त सहाय्यक शिक्षकाची जागा भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच इंदिरा पोले, उपसरपंच मंगेश लोढे, सदस्य प्रकाश विधाते, शाळा समिती उपाध्यक्ष वंदना पडगेलवार, सदस्य चैताली पडगेलवार, गावकरी जयश्री दूरड, गजानन बोढे उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...