Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / शिन्दे- फडणवीस सरकारच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

शिन्दे- फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वेदांत फॉक्सवॕन प्रकल्प गुजरातला गेला...* *शिवसेना - संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

शिन्दे- फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वेदांत फॉक्सवॕन प्रकल्प गुजरातला गेला...*    *शिवसेना - संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

*.*

 

चंद्रपूर-: फॉक्सकॉन - वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता, प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता, असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? बेरोजगारी वाढत असताना असे महत्वाचे प्रकल्प गुजरात राज्यात जातायत हे जाणीवपूर्वक होतंय याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आला पाहिजे. अन्यथा संभाजी ब्रिगेड आणी शिवसेना च्या वतीने महाराष्ट्राभर् तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना चे महानगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक् सुरेश पचारे यांनी दिला.

 

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय? असा प्रश्न राज्यसरकारला संभाजी ब्रिगेड चे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य  यांनी केला.

शिवसेना आणी संभाजी ब्रिगेड चंद्रपूर च्या शहर व जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर येथे गांधी चौकात शिवसेना चे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष विनोद थेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यसरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष विनोद थेरे यांनी राज्यसरकार धारेवर धरले.

 

महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंदीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. परंतु मविआचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष व केंद्रातील भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत याचे गांभीर्य या सरकारला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे करण्यात व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यातून त्यांना राज्य कारभार करण्यास वेळ मिळत नसावा पण थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले याचा खुलासा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे, फॉक्सकॉन - वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता, प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता, असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? बेरोजगारी वाढत असताना असे महत्वाचे प्रकल्प गुजरात राज्यात जातायत हे जाणीवपूर्वक होतंय याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आलाच पाहिजे. अन्यथा राज्यसरकारला याची खुप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेना आणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.

 

यावेळी शिवसेना महानगरप्रमुख सुरेश पचारे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडें,  जिल्हासचिव ऍड. गजानन नागपुरे, संघटक गुमदेव थेरे, पंकज चटप, शहर संघटक विजय बोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद वाभिटकर्, युवासेना उपाध्यक्ष विनय धोबे, शिवसेना चे स्वप्नील काशीकर्, विक्रांत सहारे, शालिक फाले, अब्दुल वसीम, वैभव काळे, अजय कोंडलेवार यांच्यासह शिवसेना- संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...