Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *संभाजी ब्रिगेडच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती निम्मित लोकप्रबोधन दिन संपन्न*

*संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती निम्मित लोकप्रबोधन दिन संपन्न*

 

   

चंद्रपूर: प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म  17 सप्टेंबर 1885 रोजी त्यांना 88 वर्षाचे आयुष्य लाभले त्यांनी प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतुन महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली व  त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख मिळाली.प्रबोधनकारांनी सतिप्रथा,सतीप्रथा,बालविवाह,

अंधश्रध्दा अनिष्ट प्रथा या विरोधात आयुष्य भर प्रहार केला,शिक्षण,प्रबोधन,शेतकरी,कामगारांनासाठी अनेक आंदोलने केली महाराष्ट्राचे हित व लोक हित यामध्ये कधीही तडजोड केली नाही,संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला,महाराष्ट्र धर्म,मराठी माणसासाठी अहोरात्र कार्य करत त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सतत कृतीशिल विचार व कृती करत राहीले. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने  प्रबोधनकारांच्या विचाराला व ईतरही गौत्तम बुद्ध ते जिजाऊ, शिवराय, फुले, शाहु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान या विचाराचा जागर व्हावा. असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी सांगितले की, प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर "लोक प्रबोधन दिन" म्हणुन साजरा करण्यात आला पाहिजे. त्या अनुषंगाने  संभाजी ब्रिगेड जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती व गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली सिनेट सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

   या  कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मा.विनोद थेरे , उदघाटक शिवसेना जिल्हा प्रमुख मा.संदिप गिर्‍हे.सत्कारमुर्ती- प्रा.डाॅ.दिलीप चौधरी सिनेट सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र,प्रा.निलेश बेलखेडे सिनेट सदस्य तथा युवा सेना प्रमुख चंद्रपूर.

प्रमुख उपस्थिती -चंद्रकांत वैद्य,प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सुरेश भाऊ पचारे,महानगर अध्यक्ष तथा मा.नगर सेवक शिवसेना,कुसुमताई उदार,मा.जिल्हा संघटिका शिवसेना,पुष्पाताई मालेकर,सरपंच शेणगाव,निलीमाताई इंगोले उपसरपंच मांगली(दे),अॅड.मनिष काळे महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,चंद्रपूर,यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर प्रा.डाॅ.दिलीप चौधरी,संदिप गिर्‍हे,विनोद थेरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन-चंद्रशेखर झाडे,जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,चंद्रपूर.

प्रास्ताविक-इंजी.चेतन पावडे विभागीय सचिव संभाजी ब्रिगेड.

आभार प्रदर्शन-रोहित चुटे यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गोमदेव थेरे,संतोष भोयर,संजय बोटरे,प्रकाश पिंपळकर,राजु ढेंगळे,दिपक खारकर,बाळा बोढे,प्रतिक वाटेकर,संदिप मोरे,संकेत चौधरी,निखील वडस्कर,मोहित सोरते,आमिर अहमद,मोरुभाऊ चटप,पंकज चटप,विनोद निमकर,प्रमोद मासिरकर,दादाजी सपाट,मंगेश चटकी यांनी अथक प्रयत्न केले,या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...