Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / आसन (खुर्द) येथे जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

आसन (खुर्द) येथे जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांचे पदे तात्काळ भरा

आसन (खुर्द) येथे जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांचे पदे तात्काळ भरा

शाळा व्यवस्थापन समितीची शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे यांच्याकडे मगणी

कोरपना: कोरपना तालुक्यातील आसन खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या गावात १ ते ७ पर्यंत वर्ग आहेत,परंतु मागील गेल्या २ वर्षांपासून फक्त दोनच शिक्षकांवर ७ ही वर्गाचा भार आहे,त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवीत असताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा फरक पडत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.

त्यामुळे येथील आसन खुर्द येथील विषय शिक्षकांचे पदे तात्काळ भरण्यात यावी याकरीता शाळा व्यवस्थापन समिती तर्फे शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले,तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आसन खुर्द येथील शिक्षकांची पदे भरण्यात यावी याकरिता भ्रमणध्वनीद्वारे सूचना दिल्या,यावेळी आसन खुर्द येथील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, आसन खुर्द येथील भाजपा अध्यक्ष प्रमोद पायघन, ग्रामपंचायत सदस्य भास्कर मत्ते,सुरेश पेंदोर,गणेश मुरकुटे, श्रीराम नांदेकर,अविनाश पेटकर,अशोक धाबेकर,सुरेश किन्नाके,सोनू कुमरे,सुनीता आके, वनिता पायघन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...