Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / नगर परिषदची आर्थिक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

नगर परिषदची आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्या विरुद्ध कार्यवाई करा !! !! विरोधी भाजपा पक्षाचे नगरसेवक डोहे यांची मागणी!!

 नगर परिषदची आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्या विरुद्ध कार्यवाई करा !!  !! विरोधी भाजपा पक्षाचे नगरसेवक डोहे यांची मागणी!!

!!

 

गडचांदूर -- गडचांदूर शहराला सन 2014 ला नगर परिषद चा दर्जा मिळाला तेव्हा नगर परिषदला सक्षम अधिकारी कर्मचारी मिळतील व आपल्या शहराचा विकास होतील परन्तु त्यावर पूर्णता पाणी फिरले.ग्राम पंचायत असताना शहरातील मालमता कर व्यवस्थित वसूल होत होता तसाच काही काळ वार्षिक वसुली 90 ते 95 टक्के वसुली होत होती व सफाईकामगार यांचे वेळेवर नियमित पगार होत होते.असे असताना या नगरपरिषद ला मागील चार वर्षा पूर्वी डाँ विशाखा शेळकी मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या व नगर परिषद चे वाटोळे केले.त्यांचे काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांवर दबाव नव्हता त्यामुळे नगर परिषद चे आर्थिक स्रोत समजल्या जाणाऱ्या कर विभागा कडून वसुली फार कमी 34 ते 35% टक्के इतकी वसुली करण्यात आली कर भरण्यास जाणाऱ्या सोबत गैरवर्तुनिक झाल्याचे प्रकार अनेकदा घडले तक्रारी झाल्या न्यूज पेपरला बातम्या धडकल्या परन्तु वरिष्ठ अधिकारी मात्र कुठलीही कार्यवाई करण्यास तयार नव्हते त्याचा च परिणाम सामान्य गरीब सफाई कामगारावर पडला व आज 14 महिन्याचे वेतन थकले.

        गडचांदूर येथील प्रभाग क्र दोन येथील रहिवासी श्री बाळू कोरडे नावाच्या व्यक्तीने स न 111 प्लाट क्र 44 वर सन 2015 मध्ये नगर परिषद कडून घर बांधकाम परवानगी घेतली.व सन 2017 मध्ये घर बांधकाम पूर्ण करून वास्तव्य करीत आहे.त्यानंतर तेव्हा पासून अनेकदा माझा घर टॅक्स चालू करा अशी मागणी कर विभागा कडे करीत होता परन्तु त्याकडे नगर परिषद कडून सक्षम दुर्लक्ष करीत आहे.आता त्याला रुपयांची नितांत आवश्यकता असल्याने त्याने त्याला बॅँके कडून कर्ज घ्यायचे आहे त्या करिता त्याला घराचे मालमत्ता विवरण पत्र व टॅक्स पावतीची आवश्यकता आहे.त्याकरीता त्यांनी परत दिनांक                ला न प कडे मागणी केली.परन्तु न प घर टॅक्स स्विकाराला तयार नाही.

            तसेच सुनील ठाणेकर यांनी आपल्या भावंडातील मालमत्ते चे दोन वर्षा पूर्वी रजिस्टर वाटणी पत्र केले व त्याच वेळेस रीतसर न प ला फेरफार करिता अर्ज दिला.परन्तु अजूनही त्यांची फेरफार मंजूर करणयात आलेली नाही.जर का त्याच वेळेस कोरडे यांच्या घराची नोंद व ठाणेकर यांची फेरफार घेतली असती तर नगर परिषद ला आर्थिक लाभ झाला.असे शहरात अनेक घरे आहेत जी ज्यांची न प ला नोंदच नाही.यात पूर्णता कर विभागातील कर्मचाऱ्याने  आपल्या कर्त्यव्यास कसूर केला आहे,नगर परिषद आर्थिक नुकसान केली आहे.असे नगर परिषद चे विरोधी (भाजप पक्ष्याचे )नगरसेवक अरविंद डोहे यांनी आज मुख्याधिकारी यांचे कडे समनधित कर्मचाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र औधोगिक नगरपंचायती/नगरपरिषदा अधिनियम 1965 कलम 79 अन्वये कार्यवाई ची मागणी आपल्या निवेदनात केली.असून त्याची प्रत मा जिल्हाधिकारी  तथा प्राशासन अधिकारी यांना दिली असून यावर काय कार्यवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...