Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस शहरातील देशी...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस शहरातील देशी दारूचे दुकान बंद करा ।। शिवसेनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन

घुग्घुस शहरातील देशी दारूचे दुकान बंद करा ।। शिवसेनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन

घुग्घुस: घुग्घुस शहरात नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले देशी दारू दुकान बंद करा अशी मागणी घुग्गुस शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी केली असून तसे निवेदन आज सोमवारी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा घुग्घुस येथील  शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी दिला आहे.

 

दारूबंदी उठल्यानंतर नवीन देशीदारू दुकानाला घुग्गुस शहरात परवानगी देण्यात आली.मात्र 22 जानेवारीला घुग्घुस नगरपरिषद मध्ये शिवसेनेच्या वतीनं नवीन दारू दुकानांना परवानगी देऊ नये असे पत्र देण्यात आले होते.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाने या दारू दुकानाला परवानगी दिली.

 

या दारू दुकानजवळ शाळा, महाविद्यालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,बँक आहे.तसेच याच रस्त्यावर दर रविवारीआठवडी बाजार सुद्धा भरत असून नागरिक व महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.इतकेच नव्हे तर या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार नगरपरिषद कडे या अवैध दारू दुकानाची परवानगी रद्द करण्याची मागणी घुग्घुस शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली होती.मात्र शिवसेनेच्या निवेदनाकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले.

 

दरम्यान आज सोमवारी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी  जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिले आहे.

 

 

सदर या देशी दारू भट्टीवरुन दारु पिऊन नशेत मद्यंधूद बेवळ्यांच्या जमाव व तमाशे सुरु असते यामुळे महिलांना व शालेय मुली व मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर दारु भट्टी समोर लोटांगण आंदोलन करण्यात येईल,याची सर्वस्वी जवाबदारी प्रशासनाची राहिल,

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...