वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर जनावरांना साथरोगांची लागण होऊ नये यासाठी जनावरांचे लसीकरण करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून केले जात आहे.
सतत पडणाऱ्या पावसाने वातावरणात झालेल्या बदलामुळे मानवाप्रमाणेच जनावरांवर मोठ्या प्रमाणात आजारांची लागवन झाली असून यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना व गोचीड निर्मूलन करण्यासाठी ग्रामपंचायत चुनाळा व पशुवैद्यकीय अधिकारी राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांचे लसीकरण (दि. ६) चुनाळा येथे घेण्यात आले यात 150 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या लसीकरणाच्या माध्यमातून गोचीड निर्मूलन करणे, निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे, वेषेला आजार संबंधाने चार ते आठ महिन्याच्या गायीचे कालवड व म्हशीच्या वगाराचे लसीकरण करणे, गायी-म्हशींवर उपचार करणे, गर्भ तपासणी, व्यंध्यत्व उपचार यासह अन्य तपासणी व लसीकरण करण्यात आले.
याच बरोबर जनावरांच्या पायाच्या खुरांना इजा पोचून त्यामार्फत रोगाची लागण होत असतात अशा वेळी पशुवैद्याच्या मार्गदर्शनानुसार त्यावर उपचार करणे, जनावरांना आजार होऊ नये यासाठी गोठ्यामध्ये घ्यावयाच्या काळजीसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले व निर्जंतुकीकरणासाठी फवारणी औषध देण्यात आले.
शेतीचा हंगाम सुरू असून जनावरांना आजार झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून योग्य वेळी जनावरांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले, यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच बाळनाथ वडस्कर व इतर ग्राम पंचायत पदाधिकारी, पशुवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. सुचिता धांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद जल्लेवार, आदित्य बोबडे, परिचर अलंकार तामगाडगे, अनिल चौहान, अनिकेत मनोहर निमकर व गावातील जनावर मालक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...