वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घूग्घुस : गावामध्ये असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला स्थित असलेल्या लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड या कंपनीचा रस्त्याचे काम सुरू आहे ज्यामुळे इथून होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे जे ध्वनी प्रदुषण होईल त्यामुळे गर्भवती महिलांचा गर्भपात होण्याची दाट शक्यता वाढलेली आहे व ज्यामुळे गरोदर मातांचा व मुलांचा जीव गेलेला आहे अशाप्रकारच्या घटना घडलेल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे व कंपनी मधून निघणाऱ्या आयरन च्या डस्ट मुळे गावातील प्रत्येक घरामध्ये हृदय विकार, कॅन्सर च्या संख्ये मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याची सर्वस्वी जबाबदार लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी आहे त्यामुळे कंपनीचे मालक राजेश गुप्ता व मुकेश गुप्ता यांच्यावर मानव हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
या कंपनीने घूग्घुस गावाला मागील कित्येक वर्षांपासून प्रदूषणा मध्ये अव्वल स्थान मिळवून देण्याचे काम केले आहे. परंतु आता या कंपनी द्वारा बनवण्यात येणारा रस्ता ज्यावरून या कंपनीतील जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे ज्या रस्त्याच्या बाजूला घूग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याच मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होणार असल्यामुळे ध्वनी प्रदुषण व वायू प्रदूषण होईल. ज्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा आधीच बिमार असतो सोबतच हा मार्ग सुरू झाल्यामुळे तिथे येणाऱ्या नागरिकांचा जीव जाण्याची दाट शक्यता वाढलेली आहे.शाळकरी विद्यार्थी शाळेत ये-जा करण्याचा हाच मार्ग आहे व मागील काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे व पालकांचे अपघात सुद्धा या जडवाहतुकीमुळे झालेले आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून वारंवार या गोष्टीचा विरोध आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा करण्यात येत असून सुद्धा कंपनी चा मनमानी कारभार सर्रासपणे सुरू आहे. प्रत्यक्षात कंपनीला वाहतुकीसाठी मागच्या बाजूने रस्ता MIDC कडून देण्यात आलेला आहे पण कंपनी अवैधरित्या शहराच्या मधोमध नवीन रस्ता तयार करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या कुठल्याही नागरिकांच्या जीवाला धोका झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही लाईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड या कंपनीचा मालकांची राहील.
याची दखल घेत आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की तत्काळ या रस्त्याचे काम स्थगित करण्यात यावे व पर्यायी रस्ता कंपनीच्या मागच्या बाजूने बनवण्यात यावा सोबतच कंपनीच्या मालकांविरुद्ध मानवतेचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...