Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / कोलामगुड्यावरील वाचनालयाला...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

कोलामगुड्यावरील वाचनालयाला पुस्तकांची भेट ।। कोलाम युवकांनी वाचन, लेखनाने समृद्ध व्हावे -अॅड. दिपक चटप

कोलामगुड्यावरील वाचनालयाला पुस्तकांची भेट ।। कोलाम युवकांनी वाचन, लेखनाने समृद्ध व्हावे  -अॅड. दिपक चटप

( सय्यद शब्बीर जागीरदार ) जिवती, ता ५ : कोलामगुड्यावरील समृद्धी अधोरेखित करायची असेल तर सर्वप्रथम कोलाम युवकांनी वाचन-लेखनांनी समृद्ध व्हावे. विकासाच्या मुळ प्रवाहात सामील होण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे व यासाठी प्रत्येक कोलाम युवकांनी आग्रही असले पाहिजे, असे मत चेव्हेनिंग स्काॅलरशिप विजेते अॅड दिपक चटप यांनी मांडले. यावेळी कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे उपस्थित होते.

जिवती तालुक्यातील रायपूर (खडकी) या कोलामगुड्यावर कोलाम विकास फाऊंडेशन ने स्वातंत्र्य दिनी विर शामादादा कोलाम वाचनालय/अभ्यास केंद्र सुरू केले. या वाचनालयात परिसरातील कोलाम युवक नियमितपणे एकत्र येऊन चर्चा करतात. शिवाय येथे दररोज सायंकाळी लहान विद्यार्थी अभ्यासाला बसतात. अॅड दिपक चटप यांनी या विद्यार्थ्यांना व युवक युवतींना 'मी व माझे प्रश्न' या विषयावर मार्गदर्शन केले.

 अॅड दिपक चटप यांना इंग्लंड सरकारची चेव्हेनिंग स्काॅलरशिप मिळाल्याबद्दल विविध संस्थांनी त्यांचा सत्कार करताना भेट म्हणून दिलेली बहुमोल अशी ५० पुस्तके वाचनालयाच्या पुस्तकपेढीला दान दिली आणि शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पाट्या व पेन्सिल भेट दिली. पुढील वर्षभरात पत्र लेखन, मुळाक्षरे व अंकलेखन याकडे लक्ष देऊन कोलाम युवकांनी व लहान विद्यार्थ्यांनी वाचन लेखनात तरबेज व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 यावेळी उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी सांगितले की, विविध योजना आणि विकास कामांच्या बाबतीत आपली होणारी गैरसोय, फसवणूक व लुबाडणूक यासाठी जागृत राहणे, एकजुटीने विचार विमर्श करून योग्य निर्णय करणे व आपल्या वरील अन्यायाचा प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करणे यासाठी सदर वाचनालयाच्या प्लॅटफॉर्मचा कोलामांनी उपयोग करावा आणि प्रत्येक कोलाम युवकांनी आपले व्यक्तीमत्व उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...