Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / मुनगंटीवार यांनी दाखविले...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

मुनगंटीवार यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन* *रात्री १२ वा. घेतली डुकराच्या हल्ल्यात जखमींची भेट; ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे उपचार*

मुनगंटीवार यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन*    *रात्री १२ वा. घेतली डुकराच्या हल्ल्यात जखमींची भेट; ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे उपचार*

राजुरा : महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधिरभाऊ हे राजुरा येथे (दि. ३) कार्यक्रमासाठी आले होते, याच्या आदल्या दिवशी चुनाळा येथील अजय नथु कार्लेकर या ३० वर्षीय युवकावर शेतात काम करीत असताना रान डुकराने हल्ला केला होता यात तो गंभीर झाला त्याचेवर उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे उपचार सुरु आहे. ही महीती राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा येथील दौऱ्यात सुधिरभाऊ मनगंटीवार यांना सांगितली. परंतू राजुरा च्या कार्यक्रमाला उशिर झाल्यामुळे भेट घेता आली नाही. पण या घटनेची आठवण ठेऊन गडचांदूर येथील सायंकाळाचा कार्यक्रम आटोपून रात्री 12 च्या नंतर दवाखान्यात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याची भेट घेउन विचारपूस केली यातून मुनगंटीवार यांनी व्यस्त कार्यक्रमात रात्री जाऊन जखमींची घेतलेली भेट हे माणुसकीचे दर्शन दाखविणारे आहे.

यावेळी जखमींची विचारपूस केली करून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कुळमेथे यांना योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. व तसेच उपस्थीत असलेले उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमानुसार लवकरात लवकर जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या. यावेळेस माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रभारी तहसिलदार अतुल गांगुर्डे, वनपरिक्षेत्राधीकारी येल्केवाड, कैलाश कार्लेकर, मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर पचारे, माजी अध्यक्ष संजय कार्लेकर, घनश्याम कार्लेकर, संदीप पारखी, रत्नाकर पायपरे उपस्थीत होते. घटनेचे गांभीर्य गरीब शेतकऱ्याच्या परिस्थितीची जाणीव मनात ठेऊन उशिर झाला असतांना सुद्धा सामान्य एका जखमी नागरिकांची भेट घेणे टाळले असते मात्र असे न करता पुन्हा एकदा सामान्य नागरिकांशी नाळ जुळलेला मंत्री असल्याचे यातून दाखविले आहे. गरिबाप्रती असलेली सदभावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही व प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय समाधान होत नाही. म्हणुनच सुधिरभाऊनी एक सामान्य नागरिक असतानाही रात्री उशिरापर्यंत जखमींची भेट घेऊन माणुसकीचे दर्शन घडवील्या बद्धल नतिवाईक, रुग्णालयातील रुग्ण व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...