Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / शरद जोशी यांची जयंती...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

शरद जोशी यांची जयंती रक्तदानाने साजरी ।। शरद जोशींनी लढण्याची हिंमत दिली - ॲड. वामनराव चटप

शरद जोशी यांची जयंती रक्तदानाने साजरी ।। शरद जोशींनी लढण्याची हिंमत दिली - ॲड. वामनराव चटप

( सय्यद शब्बीर जागीरदार ) जिवती: शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांची ८७ वी जयंती दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन साजरी केली. दिनांक ३ सप्टेंबरला झालेल्या या रक्तदान शिबीरात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप म्हणाले की, शरद जोशी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेला घामाच्या दामाचा मंत्र देऊन त्यांना स्वाभिमान शिकवला. 

शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचे अर्थशास्त्र सोप्या भाषेत समजावून सांगत त्यांच्या स्वातंत्र्याचा लढा उभा केला. भारतीय शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शरद जोशींचे मोठे योगदान आहे. 

आता कितीही बिकट स्थिती व अन्याय झाला तरी त्यांचे विचारच शेतकऱ्यांना पुन्हा लढण्याची हिंमत देतात, असे मत ॲड. चटप यांनी व्यक्त केले.

युगात्मा शरद जोशी यांची आठवण सदैव कायम राहावी व त्यांना वंदन करण्यासाठी कार्यकर्ते दरवर्षी जयंती दिनी रक्तदान शिबिर आयोजित करतात. रक्तदान शिबिराचे हे एकविसावे वर्ष आहे. राजुरा ग्रामीण रुग्णालयापुढील राम मंदिर सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात माजी आमदार ॲड. वामनराव चटप, ॲड. मुरलीधर देवाळकर, शेषराव बोंडे, रमेश नळे, प्रभाकर ढवस, हरिदास बोरकुटे, कपिल इद्दे, सुभाष रामगिरवार, ॲड.राजेंद्र जेनेकर, दिनकर डोहे, डॉ.भूपाळ पिंपळशेंडे, प्रशांत माणूसमारे, मारोती लोहे, भाऊजी कन्नाके, ॲड.सारिका जेनेकर, मधुकर चिंचोलकर, सुरेश आस्वले, राजकुमार डाखरे, शुभम रासेकर, स्वप्नील पहानपटे, हसन रिजवी, बबन रणदिवे, बळीराम खुजे, डॉ. गंगाधर बोढे, गजेंद्र झंवर, भाऊराव बोबडे, वसंता भोयर, बंडू देठे, रमेश रणदिवे, निखिल बोंडे, सुरज गव्हाणे, अजझर हुसेन, सूरज जीवतोडे, उत्पल गोरे, बंडू साळवे यांचेसह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले.

या रक्तदान शिबिरासाठी राजुरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुळमेथे,चंद्रपूर शासकीय रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन करून सहकार्य केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...