वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधी): घुग्घुस येथे पोळ्याच्या दिवशी भूस्खलन होऊन घर जमिनीत गाडल्या गेल्याची घटना घडली होती.त्यानंतर परिसरातील नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले.मंत्र्यांपासून तर आमदार खासदार जिल्हाधिकारी यांनी त्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले.
मदत स्वरूपात तीन हजार रुपये सुद्धा काही परिवाराला देण्यात आले. मात्र 10 ते 12 लोकांनी ती मदत स्वीकारण्यास मनाई केली. त्यानंतर आता आम्हाला पैसे नको हक्काचे घर द्या अशी मागणी घुग्घुस येथील अमराई वार्डातील नागरिकानी शासनाकडे केली आहे.
अमराई वार्डात पोळ्याच्या दिवशी एका नागरिकाचे घर भूस्खलन होऊन जमिनीत दफन झाले.यात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने त्या परिवारासह इतर कुटुंबियांना जिल्हा परिषद शाळेत हलविले.
त्याच्या जेवणाची सोय नगरपरिषद मार्फत करण्यात येत आहे.मात्र आता काही नागरिकांनी जिल्हा प्रशासनाप्रति रोष व्यक्त केला असून आम्हाला तुमचे 3 हजार रुपये नको आहेत, आम्हांला हक्काचे घर द्या, व आमचे पुनर्वसन करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...