वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधी): अंडरग्राऊंड कोळसा खाणीवर बसलेल्या चंद्रपुर तालुक्यातील नकोडा येथील घरांना भेगा पडल्या असून अनुचित घटना टाळण्यासाठी वेकोलीने सर्वे करावे व नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नकोडा येथील सरपंच किरण बंदूरकर यांच्यासह नागरिकांनी केली असून वेकोली प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
या परिसरात 1970 मध्ये भूमिगत कोळसा खाण सुरू करण्यात आली होती.त्यानंतर 2001 मध्ये ही कोळसा खाण बंद झाली.दरम्यान वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी या भागात रेती भरून योग्यरीत्या भूमिगत खाण भरली नाही.त्यामुळं या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घराला तडे गेले आहे.इतकेच नव्हे तर 2013 मध्ये येथे भूस्खलन होऊन विजय ढाक यांचे संपूर्ण घर जमिनीत गाडल्या गेले.
त्यानंतर वेकोलीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले होते.मात्र अजूनही त्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.आता तर अनेक नागरिकांच्या घराला भेगा पडत असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेकोलीने या भागात सर्वे करावे व ज्यांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली असून वेकोलीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...