वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष - प्रतिनिधी): नियम धाब्यावर बसवून घुग्घुस शहरात नव्याने सुरू झालेले देशी दारुदुकान प्रशासनाने तात्काळ बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा घुग्घुस येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग व नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत शिवसेनेच्या वतीनं नगरपरिषदेला जानेवारी महिन्यात निवेदन सुद्धा देण्यात आले होते.
दारूबंदी उठल्यानंतर नवीन देशीदारू दुकानाला घुग्घुस शहरात परवानगी देण्यात आली. मात्र 25 जानेवारीला घुग्घुस नगरपरिषद मध्ये शिवसेनेच्या वतीनं नवीन दारू दुकानांना परवानगी देऊ नये असे पत्र देण्यात आले होते.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाने या दारू दुकानाला परवानगी दिली.
या दारू दुकानजवळ शाळा, महाविद्यालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, प्रा,आ, केंद्र,गंगा माता मंदिर,पो,स्टे,नायब तहसील कार्यालया,तेथील लोक संख्या तिन हजार असून,बँक आहे.
तसेच याच रस्त्यावर दर रविवारीआठवडी बाजार सुद्धा भरत असून नागरिक व महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
इतकेच नव्हे तर या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार नगरपरिषद कडे या अवैध दारू दुकानाची परवानगी रद्द करण्याची मागणी घुग्घुस शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली होती.मात्र शिवसेनेच्या निवेदनाकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले.
त्यामुळं या देशी दारू दुकानाची परवानगी रद्द करा व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नका अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा घुग्घुस शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी दिला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...