वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधि): वणी : वणी- मुकुटबन मार्गावरील मानकी जवळ भरधाव वेगाने येत असलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीस्वारास मागुन धडक देऊन चिरडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
चरण पांडुरंग ठेंगणे (५४) रा. मानकी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार इसमाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मानकी येथील शेतकरी चरणदास ठेंगणे हे रविवारी दुपारी २: ३० वाजताच्या सुमारास आपल्या होंडा फॅशन दुचाकी क्रमांक-एम एच-२९ डब्लु- ५०४० ने का जराही कामानिमित्त वणीकडे निघाले होते. घरून निघतांना त्यांनी मुलगा आशिष ठेंगणे याला शेतात जाण्यासाठी मानकी बस स्टँड पर्यन्त दुचाकीवर सोडूले. आणि वणीकडे निघाले.
मानकी बसस्टँड पासून एक किलोमीटर समोर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या विस्फोटक वाहतूक करणाऱ्या पिकअप क्र. (एम एच-३१ डब्लु-६८४४) या वाहनाने जोरदार धडक दिली. यात चरणदास ठेंगणे यांचे डोके चेंदामेंदा ते जागीच गतप्राण झाले. मोटरसायकल धडक देऊन पिकअप वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला नालीमध्ये पलटी झाले आहे.
पिकअप वाहनाचा चालक पलटी झालेल्या पिकअपचा इंजिन चालू अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच मृतकाच्या कुटुंबियांसह गावकरी घटनास्थळी जमा झाले होते. त्यानंतर घटनेची माहिती वणी पोलिसाना देण्यात आली.
जमादार प्रभाकर कांबळे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. घटना पंचनाना करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर म्रुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...