वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
Ghugus: चंद्रपुर जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस बरसला व अतिवृष्टी झाली.वर्धा,निम्न वर्धा, अप्पर वर्धा धरण,इरई,पैनगंगा, वैनगंगा अशा सर्वच नदी दुथडी भरून वाहू लागल्या. त्यातच तालुक्यातील बेलसनी गावात पूर आला आणि होत्याच नव्हतं झालं.
गावात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले, अनेकांच्या घरात पाणी शिरले तर शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली.यात 90 टक्के शेतीवरील कापूस,तूर, सोयाबीन संपूर्ण पिकांचे मोठे नुकसान झाले.मात्र शासनाकडून अजूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
बेलसनी गावातील शेतकऱ्यांची शेती वर्धा नदी पलीकडे आहे.तर गावात काही शेतकऱ्यांची शेती आहे. बेलसनी येथील काही जमीन वेकोलीने भूसंपादीत केली आहे.त्या ठिकाणी वेकोलीचे काम सुरू असून त्या जमिनीवर वेकोलीने ओव्हर बर्डन चे काम सुरू करून माती डम्पिंग चे काम सुरू केले आहे.
त्यामुळं वर्धा नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली.पूर्वी वर्धा नदीचे पाणी गावात किंवा शेतात येत नव्हते.मात्र वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे वर्धा नदीचे पाणी गावात व शेतकऱ्यांच्या शेतात आल्यानं होत्याच नव्हतं झालं.
वेकोलीच्या ढिसाळ नियोजनामुळे वर्धा नदीचे प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले.आणि डोळ्यादेखत उभे पीक संपूर्ण उध्वस्त झाले.खरीप हंगाम संपूर्ण वाया गेला असून शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा मोठा बोजा वाढला आहे.त्यामुळं शासनाने व वेकोलीने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परशुराम निलकंठ लोड, शेतकरी चार हेक्टर, प्रकाश रामचंद्र विधाते ग्रा,प,सदस्य,एक हेक्टर,देवीदास धोडू सावे,शेतकरी एक 87 आर,मनिषा संजय वाढई माजी सरपंच 0.81आर, मंगला बाबाराव झाडे ग्रा, प, सदस्य,चैताली देवांगन पडगेलवार,ग्रा, प, सदस्य,एक 40आर , सुनिल गोविंदा वाढई दोन हेक्टर, बाबाराव बापूजी झाडे दहा आर विस,गरुड लक्ष्मण पवार साढे चार हेक्टर,रामदास नामदेव डोंगरकर, महादेव हरी बोढे एक हेक्टर 60, संबा परशुराम लोड़े,उज्वल परशुराम लोडे,महादेव देवराव वाभिटकर, ज्ञानेश्वर भाऊराव राजुरकर, श्रीहरी विठ्ठल लोडे, सचिन परशुराम लोडे,घुग्घुस येथून सात कि,मि, अंतारावर बेलसनी गावातील शेतकऱ्यांची समस्या बिगकट परिस्थी आहे,शेतकरी बाधवांची मागणी वेकोली प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी, महत्वाची बाब म्हणजे शेतकरी बाधवं याच्या शेतात शेतीच करने योग्य नाही खूप मोठा संकट,शेतकऱ्यांच्या डोळ्यात अनावरण अश्रू दिसले वृत्तसंकलनासाठी गेले असतो अनेकांचे मोठे नुकसान झाले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...