Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / संतप्त नागरिकांनी रस्त्यावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

संतप्त नागरिकांनी रस्त्यावर पेटविले टायर चिखल व धुळीने नागरिक त्रस्त; रस्त्याचे बांधकाम कासवगतीने

संतप्त नागरिकांनी रस्त्यावर पेटविले टायर    चिखल व धुळीने नागरिक त्रस्त; रस्त्याचे बांधकाम कासवगतीने

 

 

राजुरा : राजुरा-रामपूर-गोवरी मार्गाचे काम मागील दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू असून ऐन पावसाळ्यामध्ये खोदकाम केल्याने दररोज वाहतूकित मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून पावसाच्या दिवसात मोठ्याप्रमाणात चिखल साचले जाते तर इतर दिवशी धुळीचे लोंढे उडत असल्याने रस्त्यावरील वाहतूकदार व वस्तीतील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून रामपूर येथील संतप्त नागरिकांनी आज (दि. १९) सायं ४ वाजता रस्त्यावर टायर जाळून निषेद्ध केला आहे.

 

राजुरा-रामपूर-गोवरी रस्ता हा नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे, दररोज या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे, या मार्गावरून शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, वेकोली कामगार व तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्य शेकडो नागरिकांची वर्दळ असतात मात्र कासवगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे व संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्यावर  दररोज होणाऱ्या रस्ता जाम यामुळे लागणाऱ्या ट्रकांच्या रांगा या कारणाने पायदळ जाणारे विद्यार्थी, बसने प्रवास करणारे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी वेळेवर शाळेत कार्यलयात पोहचू शकत नाही, तर या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या आजूबाजूने वस्तीने असलेल्या घरात धुळीचे थर साचत असल्याने लहान बालकांपासून तर मोठ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे.

 

रस्ता जाम घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन वाहतूक सुरळीत सुरू केली. यावेळी टायर कोणी जाळले हे माहीत झाले नसले तरी पोलिसांसमोर नागरिकांनी रस्त्यांबद्दल रोष व्यक्त करीत तात्काळ रस्ता दुरुस्ती करणे दररोज रस्त्यावर पाणी मारण्याबद्दल पोलिसांसमक्ष कंत्राटदारांच्या प्रतिनिधीला सांगण्यात आले व वाहतूक सुरळीस सुरू करण्यात आली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...