वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (घुग्घुस विशेष प्रतिनिधि): न्यायालयाच्या आदेशाने घुग्घुस शहरातील अवैध होर्डिंग्ज, बॅनर नगरपरिषदेने शुक्रवारी हटविले आहे.ही कारवाई मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत अनधिकृत फलकांचे शहर म्हणून घुग्घुस शहर ओळखला जात आहे, या अनधिकृत फलकांनी केवळ शहराचे विद्रुपीकरण झाले असे नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचेही प्रश्न निर्माण केले आहेत.तसेच नगर परिषदेचा कर सुद्धा मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
सत्ताधारी व विरोधी अशा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक उभारण्याची जणू स्पर्धाच लागली होती. परिणामी, शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्ते व चौक अनधिकृत फलकांच्या जंजाळात सापडले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येण्याबरोबर अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
दरम्यान अनाधिकृत होल्डिंग्स व बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती.त्यानंतर आज शुक्रवारी न्यायालयाच्या निर्देशानुसार घुग्घुस शहरातील सर्व बॅनर होर्डिंग्ज हटविण्यात आले आहे.
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांना शहरात बॅनर,होर्डिंग्ज लावायचे असल्यास त्यांनी नगरपरिषद कडे रीतसर परवानगी घेऊन व कर भरूनच बॅनर होर्डिंग्ज लावावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी दिला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...