खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : मतदार संघातील ग्रामीण भागाला शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि छोट्या पुलांसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदर मागणी मान्य करण्यात आली असुन सदर कामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीक विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांसाठी त्यांनी यापूर्वी 20 कोटी रुपयांचा निधी खेचुन आनला आहे. तर ग्रामिण भागाच्या विकासासाठीही त्यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाला शहराशी जोडणा-या रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली होती. त्यामुळे याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता या मार्गाच्या दुरस्तीसाठी तसेच सदर मार्गावरील छोट्या पुलांच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पीय २०२२ – २३ पुरवणी यादीत ६० कोटी रुपयांची तरतुद करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदर मागणी मान्य करत या कामांसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे.
या निधीतून चंद्रपूरातील आरवट होत पठाणपुरा - माना - विसापूरहुन नांदगावला जोडणा-या मार्गाचे सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्यासाठी २१ कोटी रुपये, साखरवाही - येरुर - वांढरी - एमआयडीसी - दाताळा - चंद्रपूर या मार्गासाठी ११ कोटी रुपये, शेणगांव - उसगांव - वढा - धानोरा - पिपरी मार्डा रस्त्यावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी रुपये, ताडाळी - येरुर - पांढरकवडा - धानोरा - भोयगाव - गडचांदुर जिवती मार्गावर सिमेंट नाली आणि गट्टु लावण्यासाठी १ कोटी रुपये, शेणगाव - उसेगाव - धानोरा - पिपरी - मार्डा - शिवनी एमडीआर १२ या मार्गासाठी १ काटी ८० लाख, रुपये खर्च करण्यात येणार असुन यासह ग्रामीण भागातुन शहराला जोडणा-या इतर महत्वांच्या रस्त्यांचे बांधकामही या निधीतुन मंजूर करण्यात आले आहे. यात रस्त्यावरील छोट्या पुलांचे नालीचे व सौदर्यीकरणाची कामेही पुर्ण करण्यात येणार आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...