Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राष्ट्रध्वज आपल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राष्ट्रध्वज आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण उपविभागीय अधिकारी संपत खलाटे; चुनाळा ग्रा. पं. च्या वतीने २४० स्कुलबॅग चे वाटप

राष्ट्रध्वज आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण    उपविभागीय अधिकारी संपत खलाटे; चुनाळा ग्रा. पं. च्या वतीने २४० स्कुलबॅग चे वाटप

 

 

राजुरा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्ष झाल्याने आझादी का अमृत महोत्स निमित्य चुनाळा ग्राम पंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील मराठी व तेलगू माध्यमाच्या २४० विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थित राजुरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रध्वज आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक असून तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत 'हर घर तिरंगा' ही मोहिम राबविण्यात आली असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख पाहुणे तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, विमाशीचे जिल्हा अध्यक्ष केशवराव ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, सेवानिवृत्त प्राध्यापक शंकर पेद्दूरवार, सरपंच बाळनाथ वडस्कर, पोलीस पाटील रमेश निमकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेंद्र निमकर, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर कोमटी, ग्राम पंचायत सदस्य राकेश कार्लेकर, संतोषी साळवे, उषा करमनकर, वंदना पिदूरकर, कोमल काटम, संतोषी निमकर, जया निखाडे, सचिन कांबळे, अर्चना आत्राम, दिनकर कोडापे, रवी गायकवाड, आरोग्य सेविका रोहन, मुख्याध्यापक हरीचंद्र विरुटकर, साईबाबा इंदूरवार उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुदर्शन निमकर यांनी हर घर तिरंगा' या उपक्रमाचा मुख्य  हेतू लोकांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे असून आजच्या युवा पिढीने देश सेवेचे व्रत स्वीकारून भारत देशाला बळकट करण्याचे आव्हान केले. याच बरोबर चुनाळा येथील युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इंदिरा गांधी सभागृहाच्या वर अद्यावत अभ्यासिका बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. चूनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी ध्वजारोहण करून गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या २४० विदयार्थ्यांना स्कुल बॅग चे वाटप पाहुण्याच्या हस्ते केले. प्रास्ताविक बाळनाथ वडस्कर यांनी केले संचालन गजानन दातरवार यांनी तर उषा करमनकर यांनी आभार  मानले यावेळी विद्यार्थी पालक व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...