वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्घुस येथील राजीव रतन रेल्वे उड्डाणपुलाची व येथील वाहतूक कोंडी समस्या,जड वाहतूक विषयी वेकोली,रेल्वे अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी केली.
यावेळी घुग्घुस व परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून सुचविलेले विविध पर्याय मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होणार आहे.
चंद्रपुर तालुक्यातील घुग्घुस येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे.घुग्घुस शहरातून जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून हा मार्ग थेट मुंबई ला जोडणारा आहे.
येथे रेल्वे गेट असल्याने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. येथून दररोज रेल्वेच्या कोळशाची वॅगन जात असून हा गेट दिवसातून 20 ते 25 वेळा दररोज जवळपास 1 तास साठी बंद करण्यात येतो.
दरम्यान येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून अनेकदा अपघात सुद्धा घडत असतात.अशातच राजीव रतन चौकात उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे.त्यामुळं बायपास मार्गाचा विचार सुद्धा करण्यात आला.
तसेच उसगाव येथील जड वाहतूक बंद करणे,पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे सोबतच आज बुधवारी अधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष पाहणी केली व आढावा घेतला.तसेच नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, देवराव भोंगळे,विवेक बोढे, तहसीलदार निलेश गौड,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,सुनिल कूंभे कार्यकारी अभियंता,प्रकाश अमरशेट्टिवार उप,वि, अभियंता,पो, निरीक्षक बबन पुसाटे, समाजिक कार्यकर्ता ईबादूल हसन सिद्दिकी, वेकोलीचे अधिकारी, रेल्वे अधिकारी, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...