आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती, ता. १६ : जवळ गाडी थांबली तरी दूर पळून जाणारे कोलाम महिला- पुरुष आता एका छताखाली बसून आत्मचिंतन करू लागलेत. आत्मविश्वासाने बोलू लागलेत. कोलामांमधील हा बदल फारच सकारात्मक व आशादायी आहे. हे केवळ कोलाम विकास फाऊंडेशनच्या संघटीत लढ्यामुळे मिळालेले यश आहे. कोलामांमध्ये परिवर्तनाचे बीजारोपण झाले आहे. या चळवळीत कोलामांनी स्वत:ला झोकून दिल्यास लवकरच हा वृक्ष बहरलेला पहायला मिळेल असा आशावाद माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काल(ता.१५) रायपूर (खडकी) या कोलामगुड्यावर विर शामादादा कोलाम वाचनालय/अभ्यास केंद्राचे उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम तसेच कोलाम विकास फाऊंडेशन संस्थेची आमसभा पार पडली. या सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून श्री. शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा आदर्श शिक्षण संस्थेचे संचालक दौलतराव भोंगळे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सतलुबाई गोदरू पाटील जुमनाके, जिवती येथील माजी नगरसेविका सौ. जुमनाके, मराठा सेवा संघाचे मधुकर डांगे, राजुरा येथील माजी नगरसेवक मधुकर चिंचोलकर, चेव्हेनिंग स्काॅलरशिप विजेते अॅड. दिपक चटप, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, गाव पाटील बाजीराव कोडापे, जैतू पाटील कोडापे, रामु पाटील जुमनाके, संस्थेच्या कार्यकारी सदस्या सुनिता कुंभारे, इस्माईल भाई, पत्रुजी येलमुले आदी मान्यवर उपस्थित होते.
जिवती तालुक्यातील रायपूर कोलामगुड्यावर सकाळी ७.३० वाजता गाव पाटील बाजीराव झाडू कोडापे यांनी राष्ट्रध्वज उंचाविला. सा-या कोलामांनी तिरंग्याला सलामी देत मोठ्या अभिमानाने राष्ट्रगीत गायले. अनेक कोलामांच्या आयुष्यातील हा स्फुर्ती दायक क्षण होता. कोलाम विकास फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ग्राम विकास समितीची स्थापना करून युवकांच्या संघटीत प्रयत्नातून विर शामादादा कोलाम वाचनालय/अभ्यास केंद्र उभारण्यात आले. या वाचनालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. कोलामगुड्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या सोहळ्यात सतलुबाई गोदरू पाटील जुमनाके व अॅड. दिपक चटप यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कोलाम विकास फाऊंडेशनची आमसभा पार पडली.
सचिव मारोती सिडाम यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला. संस्थेचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी कोलामांच्या सर्वांगीण विकासासाठी जल व्यवस्थापन, जंगल व्यवस्थापन व जीवन व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देऊन कोलामगुड्यांच्या विकासाचा आराखडा शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव आयू सिडाम यांनी केले. तर आभार नामदेव कोडापे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुबाई कोडापे, झाडू कोडापे, बारीकराव कोडापे, राधा कोडापे, रूषी पडवेकर व अन्य गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...