वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्गुस शहरातील इंदिरा नगर येथील वेकोली वसाहतीची गॅलरी मंगळवारी सकाळी अचानक कोसळली.यात मात्र सुदैवानं मोठी जिवीतहानी टळली असून वेकोलीचे अधिकारी ओमप्रकाश फुलारे आणि सिव्हिल अधिकारी सुनील कपूर यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
मागील 20 वर्षांपासून वेकोलीच्या इंदिरा नगर वसाहतीत वेकोलीचे कर्मचारी आपल्या परिवारासह राहत आहेत.ही वसाहत दुमजली असून पूर्णतः क्षतिग्रस्त झाली आहे.
तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. याबाबत येथील नागरिकांनी वेकोली क्षेत्राचे प्रबंधक व सिव्हिल अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन या वसाहतीचे काम करण्याची मागणी केली होती.मात्र याकडे वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
अशातच मंगळवारी सकाळी अचानक वसाहतीची गॅलरी कोसळली.खाली टिनाचे शेड असल्यानं गॅलरीचा मलबा शेड वर पडला.त्यामुळं सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे.मात्र मोठे नुकसान देखील झाले आहे.
याची माहिती वेकोली च्या अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा ते हजर न झाल्याने वसाहती मधील कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.त्यामुळं वेकोलोच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ येथे पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी व लवकरात लवकर या वसाहतीच्या डागडुजी चे काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...