Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / पुरात अडकलेल्या ट्रक...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

पुरात अडकलेल्या ट्रक चालक व वाहकांसाठी बहिणी आल्या धावून

पुरात अडकलेल्या ट्रक चालक व वाहकांसाठी बहिणी आल्या धावून

तनिष्का महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन सण केला साजरा

राजुरा :  तालुक्यासह परिसरात मागील एक आठवड्यापासून सततच्या संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून मागील चार दिवसांपासून राजुरा-चंद्रपूर मार्ग व बल्लारपूर-सास्ती-राजुरा मार्ग होता. वाहतूक बंद असल्याने अनेक वाहने अडकुन पडली होती. रक्षाबंधन सारखा पवित्र सण असतानाही कित्येक ट्रक चालक व वाहकांना आपल्या बहिणीकडून राखी बांधता आली नाही. ही उणीव राजुरा येथील तनिष्का च्या महिलांनी भरून काढत मागील तीन दिवसांपासून लांबच लांब ट्रकाच्या लागलेल्या रांगा व त्याठिकाणी असलेल्या ट्रक चालक व वाहकांना बहिणीची माया दाखवीत सर्वांना राखी बांधून फळ वाटप केले आहे.

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता काही गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्वीकारतो. मात्र पुरामुळे हे पवित्र नात दिवसावर साजरं करता येत नसल्याचे खंत वाहन चालकांना होती. शेवटी स्त्री ही कुणाची ना कुणाची बहीण असल्याने त्या धाग्या मागच्या भावना खूप मोठ्या आहे. या भावना नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तनिष्का महिलांनी ओळखून ट्रक चालक वाहकांच्या पवित्र नात्याची उणीव भरून काढण्याचे काम करीत राजुरा-बामणी मार्गावर उभ्या असलेल्या शेकडो ट्रक चालक व वाहकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

यावेळी तनिष्का महिला लता ठाकरे, ज्योती ठावरी, मनिषा चटप, वैशाली हिंगाने, दिपाली हिंगाने, सुनिता कुंभारे, पुष्पा उईके, लता कुळमेथे, मिना डांगे, संगिता पाचघरे, हेमा लांजेकर, सुलोचना बोथले सह अन्य महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...