वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासनाने हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.त्या अनुषंगाने घुग्घुस शहरात घुग्घुस पोलिसांच्या वतीनं जनजागृती करण्यासाठी आज गुरुवारी बाईक रॅली काढण्यात आली.या बाईक रॅलीत तिरंगा घेऊन अनेक महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती व त्याचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुण पिढीला माहित व्हावा. देशभक्तीची भावना जनमानसात कायमस्वरूपी तेवत राहावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने व स्वखर्चाने आपापल्या घरावर झेंडे लावणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत घरावरील झेंडा दिवसरात्र फडकविता येणार आहे. इतर ठिकाणी मात्र ध्वज संहितेचे पालन करून झेंडा फडकवायचा आहे. जिल्हा प्रशासनाने विविध सामाजिक संघटना, उद्योजक यांना झेंड्यासाठी प्रायोजकत्व घेण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच विविध उपक्रम राबविण्याठी सर्व यंत्रणांना देखील निर्देश दिले आहेत.
अशातच घुग्घुस पोलीस स्टेशन यांच्या वतीनं गुरुवारी सकाळी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नकोडा, रामनगर,बस स्टैंड,घुग्घुस गाधी चौक, इंदिरा गांधी नगर, सुभाष नगर, एसीसी,यावेळी, जनजागृती रॅली काढण्यात आली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...