वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्गुस शहरातील अमराई वार्डात घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला घुग्गुस पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून 11 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहे.दुखनपाल उर्फ दुखा झुरी कैथल असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
घुग्गुस शहरातील अमराई वार्डात राहणारे संतोष लोंढे हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. अशातच ते परत आले असता घराचा टाळा तुटलेल्या अवस्थेत दिसला. घरात प्रवेश करून बघितले असता कपटाचे लॉक तुटलेले दिसले.त्यानंतर त्यातील ठेवलेले 16 हजार रुपये चोरी झाल्याचे यांच्या लक्षात आले.त्यांनी लगेच घुग्गुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व तपास सुरू केला.त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दुखनपाल उर्फ दुखा झुरी कैथल याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीकडून 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे,महेंद्र बुजाडे,मनोज धकाते,प्रकाश करमे, रणजित भुरसे आदींनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...