वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्घुस येथील विठ्ठल मंदिरात रविवारी, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न झाली.
शिवसेना महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख सौ. शिल्पाताई बोडखे यांच्या उपस्थितीत व चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका सौ. उज्ज्वलाताई नलगे व वर्षाताई कोठेकर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच घुग्घुस शिवसेना महिला आघाडीची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
घुग्घुस शहर शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. संध्याताई जगताप, उपशहर प्रमुख सौ. संगीताताई देवराव बोबडे, सौ. गायत्रीताई नाने यांना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख सौ. शिल्पाताई बोडखे यांच्या पत्राद्वारे नियुक्तीपत्र देऊन पदावर नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त महिला पदाधीकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना नेते बाळू चिकनकर, उपतालुका प्रमुख गणेश शेंडे, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, माजी शहरप्रमुख बंटी घोरपडे, अजय जोगी, शहंशाह शेख, महिला आघाडीच्या सखुबाई मोहितकर, सुमन बांदूरकर, ताराबाई बोबडे, मनीषा चौधरी, निर्मला खनके, निलीमा हिरादेवे, वंदना बांदूरकर, सविता सोनटक्के, सुलोचना पिंपळकर व मोठया संख्येत महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...