Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / उर्जा विभागाने पुरपरिस्थितीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

उर्जा विभागाने पुरपरिस्थितीत आणि कोरोना काळात दिलेली सेवा समाज विसरणार नाही - आ. किशोर जोरगेवार*

उर्जा विभागाने पुरपरिस्थितीत आणि कोरोना काळात दिलेली सेवा समाज विसरणार नाही - आ. किशोर जोरगेवार*

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उर्जा विभागाच्या वतीने मुल येथे उज्वल भारत उज्वल भविष्य कार्यक्रमाचे आयोजन.*

 चंद्रपुर  : पुर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा समजल्या जायच्या मात्र आता बदलल्या काळासोबत मानवी गरजा वाढत चालल्या आहे. आता विज हि सुध्दा मानवाची प्रमुख गरज बनली आहे. त्यामुळे उर्जा विभागात काम करणा-या कर्मचा-र्यांची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी ते उत्तमरित्या पारही पाडत आहे. विशेताह कोरोना आणि पुरपरिस्थिती च्या काळात उर्जा विभागाने केलेले कार्य, त्यांनी दिलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त उर्जा विभागाच्या वतीने उर्जा महोत्सव मनविल्या जात आहे. या अनुषंगाने आज मुल येथे उर्जा विभागाच्या वतीने उज्वल भारत उज्वल भविष्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, चंद्रपूर परिमंडळ महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, पावरग्रिडचे मुख्य महाप्रबंधक ए. सेनशर्मा, चंद्रपूर महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चीवंडे, कार्यकारी अभियंता हरिचंद्र बालपांडे आदींची मंचावर उपस्थिती होती.

           यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महावितरणच्या वतीने वृक्षारोपण, वीज बचत जनजागृती, विद्युत सुरक्षा सप्ताह, असे उपक्रम राबऊन सामाजिक कार्यही केल्या जात आहे. यासोबतच कृषीपंप योजना, डिजीटल सेवा, ग्राम विद्युत व्यवस्थापन योजना, ग्राहक संवाद मेळावे, कृषी ग्राहक मेळावे उर्जा विभागाच्या वतीने आयोजित केल्या जात आहे. एंकदरीत विचार केला असता बदलत्या काळासोबत उर्जा विभागही बदले असुन उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

  कोरोना काळ हा कठीण होता. अशा लाँकडाऊनच्या काळातही उर्जा विभागातील कर्मचारी उत्तमरित्या आपले कर्तव्य बजावत होते. त्यानंतर आता चंद्रपूरात आलेल्या पुरपरिस्थितीत महावितरणच्या कर्मचा-र्यावर मोठी जबाबदारी होती. अनेक भागात पाणी शिरल्याने तेथील विद्युत पुरवठा खंडीत करावा लागला होता. यावेळी ही कोणत्या भागात पाणी शिरले याची अचुक माहिती घेत कोनतीही मोठी दुर्घटना होणार नाही याचे योग्य नियोजन उर्जा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे. अशा शब्दात यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उर्जा विभागातील कर्मचा-र्यांचे कौतुक केले.

   आधि विद्युत पुरवठा खंडीत झाला तर तो सुरळीत करण्यासाठी दोन ते चार तासांचा कालावधी लागायचा मात्र ही प्रक्रियाही आता ऊर्जा विभागाने गतीशील केली आहे. विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. वन नेशन वन ग्रेड हा उपक्रम उर्जा विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. याच प्रमाणे वन फॅमेली वन मिटर ही संकल्पनाही महावितरणे राबवावी, अनेकदा घरच्या मिटरवरन घरगुती वाद होतात हे टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र मिटर महावितरणे उपलब्ध करुन द्यावे असेही यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. मुलचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. उर्जा विभागाने या कार्यक्रमाला मला आमंत्रीत केले या कार्यक्रमातुन मि सुध्दा नवी उर्जा घेऊन जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला महावितरणच्या कर्मचा-र्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...