Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / बोगस कामाचा आरसा ! मराईपाटण...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

बोगस कामाचा आरसा ! मराईपाटण ते बाबापूर नवख्या रस्त्यावर खड्डेच खड्डे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे वाजले बारा...!

बोगस कामाचा आरसा ! मराईपाटण ते बाबापूर नवख्या रस्त्यावर खड्डेच खड्डे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे वाजले बारा...!

कंत्राटदार व इंजीनियर मालामाल तालुक्याती नागरिकांनी केली कारवाईची मागणी

( सय्यद शब्बीर जागीरदार ) जिवती :- जिवती तालुक्यातील माराईपाटण ते बाबापुर हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. रस्त्याला पंधरा दिवस देखील होत नाहीत ; तोच रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुरावस्था झाल्याचे व काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डे पडल्याने नागरिकांची दिशाभूल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत माराईपाटण ते बाबापुर हा लाखो रुपये खर्चाचा रस्ता अवघ्या पंधरा दिवसापूर्वीच बनविण्यात आला होता. परंतु पंधरादिवसातच या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे  पडलेले आहेत. व डांबरखडी निघण्याचा प्रकार

सुरू झाला आहे. ग्रामीण भागाला पक्क्या दर्जेदार रस्त्यांनी जोडले जावे, दुर्गती झालेल्या रस्त्यांचे पुनर्जीवन करून सर्व खेड्या गावांना विकासगंगेशी जोडावे अश्या उदात्त हेतूने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेवर करोडो रुपये शासन खर्च करत आहे. सध्या जिवती तालुक्यात अनेक रस्त्यांची कामे या योजनेअंतर्गत होत असून, ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत.  सोबतच कामात अनेक अनियमितता नागरिकांच्या  निदर्शनास येत आहेत.वारंवार तक्रारी करण्यात आले.वर्तमान पत्रात बातम्या प्रकाशित करण्यात आले असून सुध्दा संबधित  बांधकाम विभागाचे अभियंता व कंत्राटदाराचे अर्थपुर्ण मैत्रीमुळे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे

सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामात मोठा गैरप्रकार सुद्धा झाला असल्याचे बोलले जात आहे. सदर काम कंत्राटदाराकडून अतिशय थातूरमातूर पद्धतीने करण्यात आले असल्याने रस्त्यावरील डांबरीकरण सुद्धा दर्जाहीन होऊन रस्ता अल्पावधीतच खराब झाला आहे. तसेच डांबरीकरण करण्याच्या आधी केलेल्या खडीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर झालेले मजबुतीकरणाचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होऊन रस्ता अल्पावधीतच खराब झाला आहे नवख्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याचे दृश्य दिसून येत आहे , त्यामुळे परिसरातील नागरीकांना या रस्त्यावरून प्रवास करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्या याबाबत परिसरातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.  

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील या रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्याने आणि संबधित इंजिनियरने मिळून या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सदर कामाची आणि जिवती तालुक्याती संपुर्ण झालेल्या नवीन रस्त्याची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करावी अशी  जिवती तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे. तसेच या रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे अशी ही नागरिकांची मागणी आहे सदर रस्त्याचा कंत्राटदारावर व इंजिनीयरवर उच्चस्तरी चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील जनतेच्या वतीन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...