वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :घुगुस प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून अतिवृष्टी झाल्याने पुरामुळे चंद्रपूर तालुक्यातील नदीतीरावरील बेलसनी, म्हातारदेवी, उसेगाव, वढा, धानोरा, पिंपरी या गावातील शेतकरी बांधवाचे शेतातील पिके खरवडून गेले आहे किंवा आता ते पीक हातात लागण्या जोगे नाही. त्या मुळे शेतकरी बांधव अत्यंत हतबल झाला आहे, संभाजी ब्रिगेड शासनामार्फत शेतकऱ्यांना मोठी मदत मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे, संभाजी ब्रिगेडचे सामाजिक दायित्व म्हणून नेहमी काही काम चालूच असते, परंतु आता नदीला लागून असलेल्या शेतकरी बांधवाना दुबार/तिबार पेरणीची वेळ आल्याने शेणगाव येथील वैद्य अँग्रोटेक हे नावाजलेले कृषी प्रतिष्ठान समोर आले आहे. त्याचाच पहिला टप्पा वढा आणि पिंपरी (धानोरा) या नदीलगत पुरग्रस्त गावाची पाहणी करून *वैद्य_अँग्रोटेक_शेणगाव* कडून पूरग्रस्त शेतकरी बांधवाना मदत म्हणुन पेरणीसाठी प्रत्येकी 2Kg तूर बियाणे वाटप करण्यात आले. वाटप करण्यासाठी संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी मंगेश चटकी, प्रशांत ठाकरे, प्रमोद मासिरकर, पिंपरी येथील गणेश आवारी, चंदू माथने, पारस पिंपळकर, कृषीमित्र भोयर, वढा येथील सतीश गोहोकार, प्रमोद हागे, आदी ग्रामस्थांनी मदत केली. उर्वरित टप्प्यात धानोरा, उसेगाव, म्हातारदेवी आणि बेलसनी या पुरग्रस्त गावांना लवकरच भेटी देऊन गरजू पूरग्रस्त शेतकरी बांधवाना तुरीचे बियाणे मोफत वाटप करणार असल्याचे वैद्य अँग्रोटेक चे संचालक चंद्रकांत वैद्य म्हटले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...