वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : जुलै महिन्यात सततच्या होत असलेल्या पावसामुळे वर्धा नदीला महापूर आला यामध्ये वेकोली व नगर परिषदेच्या जल वाहिन्या वाहून गेल्या यामुळे नळा च्या माध्यमातून शहरात होणारा पाणी पुरवठा बंद झाला व शहरातील सर्व वॉर्डांत पाणी टंचाई निर्माण झाली व वेकोलीच्या फिल्टर प्लांट मधून ही पाणी मिळणे बंद झाले अश्या प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी हे पाणी विकत घेऊन दोन वॉटर टँकरच्या माध्यमातून नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करीत आहे.
व पाणी टंचाई पूर्ण शहरात असल्याने उद्योगांना ही वॉटर टँकरची मागणी करण्यात आली. यामध्ये वेकोलीने पुढाकार घेत सात मोठे व लहान वॉटर टँकर उपलब्ध करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असे करीत असताना एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सदर टँकर आपलेच असल्याचे आव आणत वॉटर टँकरचा पाईप हातात धरून फोटो बाजीच्या माध्यमातून समाज माध्यमावर चमकोगिरी करण्यास शुरुवात केली व फक्त एका विशेष राजकीय पक्षाच्या लोकांनाच पाणी देण्याचा सपाटा सुरू केला
सदर घटनेची तक्रार काही नागरिकांनी काँग्रेस कार्यालयात करताच आज दुपारी 02 वाजताच्या सुमारास काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पवन आगदारी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी वेकोली अधिकारी सब एरिया मॅनेजर फुलारे यांना घेराव घातला व सदर वॉटर टँकरवर वेंकोली तर्फे जलसेवा असे फलक लावावेत व पाणी वाटपा करिता टँकर हे नगर परिषदेच्या स्वाधीन करावे अशी मागणी केली.
कार्यकर्त्यांचा रौद्ररूप बघता वेकोली तर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
वेकोली अधिकारी यांनी हे पाणी पुरवठा सर्व सामान्य नागरिकां साठी असून कुठल्याही राजकीय पक्षाचा यांच्याशी देणे घेणे नसल्याचे स्पष्ट करीत सदर टँकर वर वेकोलीचे फलक लावण्याचे मान्य करीत टँकर नगरपरिषदेच्या स्वाधीन करण्याचे ही मान्य केले
यावेळी तिरुपती महाकाली,शेख शामिउद्दिन,अलीम शेख,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,आकाश चिलका,शाहरुख शेख,प्रदीप आसेकर,कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे,दीपक पेंदोर,प्रशांत सारोकार,र्अँकेश मडावी, रफिक शेख,कपिल गोगला,सुनील पाटील, अजय त्रिवेणी,वतन अटेल्ला, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...