वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : बहोत हुई म्हांगाई की मार अब की बार मोदी सरकारच्या घोषणा देत सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी शासनाने गहू, दही,पनीर सारख्या खाद्य पदार्थावर पाच टक्के वस्तू व सेवाकर लावले यासोबतच शालेय साहित्यावर अठरा टक्के,हॉस्पिटल रूम यासह अन्य जीवनावश्क वस्तू वर लादलेल्या वस्तू व सेवा कराच्या निषेधार्थ
आज दुपारी बारा वाजता भर पावसात गांधी चौक घुग्गुस येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
भर पावसात ही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आंदोलनात हजेरी लावून हातात फलक घेवून मोदी सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देत निषेध नोंदविला.
केंद्रातील मोदी सरकार हे श्रीमंतांचे सरकार असून सर्व सामान्य व गरीब जनतेला विविध कराच्या माध्यमातून महागाई वाढवून जगणं हराम करीत आहे.
हे सरकार पूर्णतः अपयशी असून नोटबंदी, जि. एस. टी. शेतकरी विरोधी, कामगार विरोधी कायदा ,अश्या अनेक जनविरोधी योजनेचे हे फसवें सरकार आहे अश्या शब्दात काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी आपले मत व्यक्त केले.
देशातील जनतेने आता तरी सावध व्हावे आपल्या देशाची वाट चाल हे श्रीलंकेच्या दिशेने होत असल्याचे मत माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पवन आगदारी यांनी व्यक्त केले.
किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी वाढत्या महागाईला घेवून मोदी शासनाला धारेवर धरले गेली सत्तर वर्षात जे कधीच घडल नाही ते या सरकारने करून दाखवलं खाद्य पदार्थावर पाच टक्के वस्तू व सेवा कर लावून हे गरीब विरोधी सरकार असल्याचे सिद्ध केले.
याप्रसंगी सौ.संगीता बोबडे,सौ.यास्मिन सैय्यद,सौ. पदमा त्रिवेणी, आमिना बेगम,दुर्गा पाटील,संध्या मंडल,सौ.मंगला बुरांडे, कामगार नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, डॉ. वासेकर, तिरुपती महाकाली,शेख शमिउद्दिन,अलीम शेख,मोसिम् शेख,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,आकाश चिलका,शाहरुख शेख,देव भंडारी,साहिल सैय्यद,रफिक शेख,प्रशांत सरोकार,अरविंद चंहादे,दीपक पेंदोर्, दिनेश घागरगुंडे,दीपक कांबळे,कुमार रुद्रारप,सुनील पाटील, बालकिशन कुळसंगे,योगेश ठाकरे,वतन अटेला,सुधाकर जुनारकर,कपिल गोगला,बापूजी क्षीरसागर,विशाल नागपुरे,प्रदीप आसेकर,अजय त्रिवेणी,अंकुश सपाटे,राजकुमार निरवटला,नाना परसुटकर, सौरा लंका यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...