Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / अधिका-र्यांसह आमदार...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

अधिका-र्यांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी*

अधिका-र्यांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी*

अधिका-र्यांना सुचना, नागरिकांच्या अस्थायी निवा-याचीही पाहणी*

  चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांसह चंद्रपूरातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुलाचे पाणी घरात शिरल्याने बेघर झालेल्या नागरिकांसाठी करण्यात आलेल्या अस्थायी निवा-याचीही पाहणी केली असुन येथील सोयी सुविधांचा आढावा घेतला आहे. यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवा, तहसिलदार निलेश गोंड शहर अभियंता महेश बारई, अभियंता विजय बोरीकर, मनपा स्वच्छता निरिक्षक संतोष गर्गेलवार, मनपा सॅनिटरी इन्स्पेक्टर मडावी, भुपेश गोठे, चांदा रयतवारी विभागाचे तलाठी प्रवीण वरभे, पडोली विभागाचे तलाठी विशाल कुरेवार अंभोराचे उपसरपंच प्रभाकर ताजने, ग्रामपंचायत सदस्य लवलेश निषाद, सुदर्शन निषाद, सुगवेंदरसिंग भट्टी  आदिंची उपस्थिती होती.

         मागील आठवडा भरापासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरात पुलस्थिती निर्माण झाली आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी पुरग्रस्त असलेल्या भागाची पाहणी केली आहे. यावेळी अधिका-र्यांसह त्यांनी रहमतनगर, सिस्टर काॅलनी, भिवापूर येथील भंगाराम वार्ड, हनुमान खिडकी, दालदमल, पठाणपूरा गेट दाताला पुलीया, विठ्ठल मंदिर वार्ड या ठिकाणी जाउन पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या नुकसाणीचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी माहिती जाणून घेतली. या भागात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या मदत कार्याचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी माहिती घेतली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या भागात मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. याचाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा घेतला. पुलाचे पाणी घरात शिरल्याने प्रशासनाच्या वतीने पिढीत नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील महाकाली कन्या शाळा, माना प्राथमीक शाळा, शहिद भगतसिंह शाळा, महात्मा फुले शाळा, किदवाई स्कुल, नागाचार्य मंदिर, गुरुमाउली मंदिर या ठिकाणची  आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत येथील नागरिकांना दिल्या जाणा-या सोयी सुविधांची माहिती घेतली. तसेच यावेळी प्रशासनाला आवश्यक त्या सुचनाही केल्या आहे. तसेच दाताडा परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशा नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था यावेळी गुरुसाई पाॅलिटेक्निक येथे तर लखमापुर येथील पुल पिढीत नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था ताज काटा काॅम्प्लेक्स येथे करण्यात आली. या प्रसंगी  यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, अल्प संख्याक विभागाचे युथ शहर प्रमुख राशेद हुसेन, विश्वजित शाहा, सलिम शेख, विलास सोमलवार, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विनोद अनंतवार, इमरान शेख, अॅड. परमाहंस यादव, राम जंगम, नितेश गवळी आदिंची उपस्थिती होती

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...