Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / कुर्झा वार्डातील मातब्बर...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रात रस्त्याची ऐसी तैसी ।। वाळू व इतर मोठं मोठ्या भरधावं वाहणाने मुख्य रस्त्याची दैनावस्था

कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रात रस्त्याची ऐसी तैसी  ।।  वाळू व इतर मोठं मोठ्या भरधावं वाहणाने मुख्य रस्त्याची दैनावस्था

रवि चामलवार /ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी :- नागरिकांना स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न पाहणे सहज आहे तर तसे स्वप्न दाखवत, शहराच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असल्याचे शब्द देतं प्रसंगी मुद्रंकावर लेखी आश्वासन सुद्धा देतं नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करणाऱ्या कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रातुन रात्र भर सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करी व इतर मोठं मोठ्या भरधावं वाहणाच्या वर्दळीने वार्डातील मुख्य रस्त्याची मोठी दैनावस्था झालेली आहे.

राजकारणात मोठा वजन व आर्थिक बाजू भक्कम असलेल्या उमेदवारांना मतदार राजा निवडणुकीच्या पटलावर बरेचदा "अर्थकारणाने" प्राधान्य देतं एकहाती सत्ता देतं असल्याचे शहरातील राजकारणात नेहमीच दिसून येते.

सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात असलेला त्यांचा तोरा व भक्कम आर्थिक बाजूने सर्वसाधारण मतदारांना भुरळ पाडत साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर सत्ते साठी करतांना आढळून येतात. सत्ता येते मात्र सर्वसाधारण नागरिकांच्या अपेक्षेचे, त्यांच्या भागातील विकासाचे, दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडत पुढील पाच वर्ष नागरिकांना "वनवास" झाल्याचा अनुभव मात्र नक्की येतो.

जुना पुराना डांबराचा असलेल्या शहरातील कुर्झा वार्डातील मुख्य रस्ता व समता कॉलनी कडे जाणाऱ्या मार्गाची क्षमता आणि त्यावर धावणाऱ्या भरधावं वाळू टिप्परचा लोड यात चार /पाच पट मोठी तफावत असून सुद्धा ओके सिग्नल मिळत असल्याने हजारो लोकांच्या जाण्या येण्या साठी असलेल्या मार्गाची झालेली दुरव्यवस्था व दुरुस्ती ची जबाबदारी कुणाची..?या प्रश्नात आता स्थानिक नागरिक गुंतले असून नागरिकांच्या मार्गात आलेला रस्त्याच्या गुंतवळ्याचा गंभीर विषय स्थानिक मातब्बर लोकप्रतिनिधी सोडवणार अथवा वाढवणार हे आता येणारा काळचं ठरवेल. 

तर भविष्यात मतदार राजा जागृत होतं विकासाचे सारथी म्हणून स्वतःपुढाकाराने योग्य उमेदवारला पसंत करीत नगर परिषद सभागृहामध्ये त्यांचे नेतृत्व व विकास कामे करण्यास धाडतील हे नाकारता येणार नाही.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...