आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार ) जिवती :- जिवती महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. गेल्या सात-आठ महिन्यापासून वीज ग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तालुक्यातील अनेक ग्राहकांना अवाच्या सव्वा रकमेची विज बिल येत आहेत. वीज ग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलद गतीचे वीज मीटर या समस्यांना वीज ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
तालुक्यातील जिवती येथे अनेकांना महावितरण कंपनीने वाढीव वीज बिल पाठविले आहे. एका गरीब शेतकऱ्याला तर एका महिन्याचे एक लाख ३८० रुपये इतके विज बिल आले. एक लाखाहून अधिक बिल पाहून शेतकरी चक्रवला गेला आहे. तालुक्यातील जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके या शेतकरी ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल एक लाख तीनशे ऐंशी आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेले वीज बिल पाहून केशवराव कोटनाके यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी महावितरणचे कार्यालय गाठले तेव्हा अधिकाऱ्यांनी ४४२९० रुपये इतके विज बिल करून दिले. इतके विज बिल कसे भरायचे तरी कसे असा प्रश्न आता कोटनाके यांच्यासमोर आहे. कोटनाके यांचे लहानस कुळाच घर आहे.वीज वापर तितका नाही तर इतके बिल कसे काय आले असा प्रश्न पडला आहे.
या शेतकऱ्यांच्या कुटुंबात ना टीव्ही, ना पंखा, कुलर नाहीच नाही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही वापरत नाही फक्त घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब लावला जातो. तरीपण विज बिल आल्याने हे विज बिल भरायचे संकट शेती करून जगणाऱ्या या कुटुंबावर आले आहे.
चुकीचे रीडिंग घेणे, मीटरचे रीडिंग न घेणे,मीटर बंद दाखवून अंदाजे विज विजबिल आकारून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक कुटुंबांना ४०,७० व एक लाखाचे वर बिल आले आहे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नही विज बिल एवढे नाही मग वीज भरणा कसे करावे असा प्रश्न उपस्थित आहे.
तसेच बिल भरण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्याकडून नेहमी तगादा लावला जातो.वीज न भरल्यास वीज कनेक्शन तोडून अनेकांना अंधारात ठेवल्याचे प्रकार सुरू आहे.
दरवेळी सामान्य नागरिकांना वीज बिलचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. प्रत्येकवेळी अंदाजे बिल काढून हजारो व लाखोचा बिल देतात महावितरण कार्यालय आपले चूक लपण्यासाठी नेहमी एकच कारण सांगू बिल भरून घेत आहे.ग्राहकांनी कार्यालयात धाव घेतल्यास काही रक्कम कमी करुन बील भरल्यास सांगून देतात जर बील ना भरल्यास मीटर कपात करत असतात असे तालुक्यातील अनेक ठिकाणी भोंगळ कारभार करत आहे.
जुन्या रिडींग प्रमाणे बिल काढण्यात येत आहे.नियमितपणे बिल भरत नसल्याने असे अनेक बिलामध्ये जुना रीडिंग प्रमाणे बिल वाढून येत आहे.आता आम्ही नियमितपणे मीटरची तपासणी करून रिंडिंग बिल देत आहे.
नितेश ढोकणे,
उप अभियंता MSEB जिवती
अंदाजे रिडींग प्रमाणे हजरो, लाखोंचा बिल - कुठून भरणार सर्वसामान्य शेतकरी कुटुंबा,
आज शेतकऱ्यांवर दुहेर पेरणीची वेळ आली असुन महावितरणाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्गाला महावितरण कडून लाखोंची बिल देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत. ही धक्कादायक बाब आहे. याकडे शासनी व प्रशासनी लक्ष्य द्यावी.
- कंटू कोटनाके ग्राहक, जिवती
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...